Archana Gautam | बिग बाॅस 16 फेम अर्चना गौतम थेट प्रियंका गांधी यांच्या भेटीला, खास कॅप्शन…
एका भांडणामध्ये अर्चना गौतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अर्चना गौतम हिच्या विरोधात संतापाची लाटही बघायला मिळाली. अनेकांनी अर्चना गौतम हिच्यावर टिका केली.
मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये अर्चना गौतम हिने धमाका केला. बाॅलिवूड (Bollywood) किंवा टिव्ही क्षेत्राशी काहीच संबंध नसताना अर्चना गौतम ही बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाली. विशेष म्हणजे बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिला प्रेमही दिले. अनेकदा बिग बाॅस 16 मध्ये असताना अर्चना गाैतम (Archana Gautam) हिचा क्लासही सलमान खान याने घेतला. बिग बाॅस 16 मध्ये असताना काहीही कारण नसताना अर्चना गाैतम अनेकदा घरातील सदस्यांसोबत भांडणे करताना दिसली होती. अर्चना गाैतम हिच्या निशाण्यावर एमसी स्टॅन हा असायचा. बिग बाॅस 16 मध्ये असा एकही सदस्य नाही, ज्याच्यासोबत अर्चना गाैतम हिचे भांडण झाली नाही.
एका भांडणामध्ये अर्चना गौतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अर्चना गौतम हिच्या विरोधात संतापाची लाटही बघायला मिळाली. अनेकांनी अर्चना गौतम हिच्यावर टिका केली. यावेळी बिग बाॅस 16 मधून अर्चना गौतम हिला बाहेर काढण्यात आले. मात्र सलमान खान याने परत तिला शोमध्ये घेतले.
बिग बाॅस 16 मधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अर्चना गौतम हिच्याकडे बघितले जाऊ लागले. साैंदर्या शर्मा आणि प्रियंका चाैधरी या तिच्या खास मैत्रीनी बिग बाॅसमध्ये होत्या. बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यानंतर अर्चना गौतम हिने अनेकदा एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे याला टार्गेट केले.
सध्या अर्चना गौतम हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अर्चना गौतम हिने शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोमध्ये प्रियंका गांधी या दिसत आहेत. प्रियंका गांधी यांच्यासोबतच दोन फोटो शेअर करत तिने खास कॅप्शनही शेअर केले. यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
View this post on Instagram
प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी अर्चना गाैतम ही थेट रायपुरला पोहचली होती. या फोटोमध्ये अर्चना गाैतम ही प्रियंका गांधी यांना बोलताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाची साडी घातलीये. हे फोटो शेअर करताना अर्चना गाैतम हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझी दिदी माझी प्रेरणा आहे… जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ही अर्चना तुमची आहे.
आता अर्चना गाैतम हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अब्दू रोजिक याने बिग बाॅस 16 मधील स्पर्धेकांसाठी एका खास पार्टीचे आयोजन मुंबईमध्ये केले होते. मात्र, या पार्टीमध्ये अर्चना गाैतम दिसली नव्हती. यावरून अर्चना गाैतम हिला विचारण्यात आले, त्यावेळी अर्चना गाैतम म्हणाली की, मला अब्दू रोजिक याने पार्टीसाठी बोलावले नव्हते.