Bigg Boss 16 | गौहर खान हिने केली बिग बाॅस 16 च्या विजेत्याची घोषणा, नेटकऱ्यांनी लावला क्लास…
यापैकी एकजण बिग बाॅस १६ चा विजेता होईल. गौहर खान हिने प्रियंका चाैधरी हिला बिग बाॅस १६ चा विजेता म्हटल्यानंतर शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी तिचा चांगलाच क्लास लावला आहे.
मुंबई : जिकडे बघावी तिकडे फक्त आणि फक्त बिग बाॅस १६ ची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर चाहते सतत आपल्या आवडत्या स्पर्धेकासाठी पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) च्या फिनालेला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरीच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. बिग बाॅस ७ ची विजेती गौहर खान हिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. गौहर खान हिने या पोस्टमध्ये थेट बिग बाॅस १६ च्या विजेत्याचे नाव घोषित केले आहे. गौहर खान हिची ही पोस्ट पाहून अनेकजण हैराण झाले असून बिग बाॅसला फिक्स्ड शो असल्याचे थेट म्हटले आहे. गौहर खान (Gauahar Khan) हिला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. चॅनलच्या प्रेशरमुळे गौहर खान हिने ही पोस्ट केल्याचे देखील यावेळी अनेकांनी म्हटले आहे. बिग बाॅसच्या घरात सध्या प्रियंका चाैधरी, शिव ठाकरे, शालिन भमोट, एमसी स्टॅन आणि अर्चना गाैतम हे स्पर्धेक आहेत. यापैकी एकजण बिग बाॅस १६ चा विजेता होईल. गौहर खान हिने प्रियंका चाैधरी हिला बिग बाॅस १६ चा विजेता म्हटल्यानंतर शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी तिचा चांगलाच क्लास लावला आहे.
गौहर खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, यावेळी विजेती प्रियंका चहर चौधरी असेल असे मला वाटते…गौहर खान हिची ही पोस्ट पाहून एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांचे चाहते नाराज झाले असून गौहर खान हिला ट्रोल केले जात आहे.
बिग बाॅस १६ ची विजेती प्रियंका चाैधरी असल्याचे गौहर खान हिने म्हटल्यानंतर सोशल मीडियावर गौहर खान हिलाच ट्रोल केले जात असून गौहर खान हिने शेअर केलेल्या पोस्टवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
Gut feeling , Priyanka will win #bb16 !
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) February 9, 2023
गौहर खान हिच्या पोस्टवर एकाने लिहिले की, बरे झाले हिने शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅन यांचे नाव लिहिले नाही. कारण आतापर्यंत हिने ज्यांना बिग बाॅसचा विजेता म्हटले आहे ते कधीच विजेते प्रत्यक्षात झाले नाहीत.
दुसऱ्या युजर्सने लिहिले की, मनात असेल तर चांगलं… मनात नसेल तर चांगलं… शिवचा मेहनतीवर विश्वास आहे… आणि तो मेहनत करेल… पण तुमचं ट्विट आमची आशा संपवणार नाही…शिव जिंकेल…
तिसऱ्या युजर्सने लिहिले की, ही भावना नाहीये… याला चॅनलचा दबाव म्हणतात, कारण त्यांना त्यांच्या आवडत्या सुनेलाच बिग बाॅस १६ ची विनर बनवायचे आहे. त्यामुळे हे सर्वकाही सुरू आहे.