Bigg Boss 16 | निम्रतची कॅप्टनसी टास्कमध्ये चीटिंग, शिव ठाकरेची संधी हुकली…
निम्रत कौरने संचालक म्हणून तिचा निर्णय बिग बॉसला सांगितला. मात्र, निम्रतचा निर्णय घरातील एकाही सदस्याला आवडला नाही. निम्रतने दिलेल्या निर्णयानंतर घराचा नवीन कॅप्टन गौतम विज झालाय.
मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चांगलेच रंगात आले आहे. कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा झाला. निम्रतचा कॅप्टन पदावरून पायउतार बिग बाॅसने केला. यामुळे घरातील इतर सदस्यांना देखील मोठा धक्काच बसला. बिग बॉसने कॅप्टन बनण्यासाठी एक टास्क घरातील सदस्यांना दिला. या टास्कचे (Task) संचालन करण्याचा अधिकार बिग बॉसने निम्रतला दिला. या टास्कमध्ये निम्रतने चीटिंग करत गौतम विजला घराचा नवा कॅप्टन (Captain) बनवले. यानंतर आपल्यावर अन्याय झाल्याने शिव ठाकरेने बिग बॉसच्या घरात मोठा गोंधळ घातला.
View this post on Instagram
निम्रत कौरने संचालक म्हणून तिचा निर्णय बिग बॉसला सांगितला. मात्र, निम्रतचा निर्णय घरातील बऱ्याच सदस्याला आवडला नाही. निम्रतने दिलेल्या निर्णयानंतर घराचा नवीन कॅप्टन गौतम विज झालाय. मात्र, गौतम कॅप्टन झाल्यानंतर घरामध्ये लगेचच मोठा हंगामा बघायला मिळाला. साजिद खान आणि शालिनमध्ये जोरदार हंगामा झाला. यावेळी शालिनवर अत्यंत मोठा आरोप करण्यात आला होता.
टास्क संपल्यानंतर अर्चना आणि शालिनमध्ये भांडणे झाली. अर्चनाने शालिनवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. या वादात साजिद खान देखील पडला. अर्चनाला शालिनने धक्काबुक्की केली आणि आम्ही ती स्वत: बघितली असे घरातील एकून 5 सदस्यांनी म्हटले होते. त्यानंतर शालिनला काय दंड द्यायचा हा निर्णय बिग बॉसने गाैतमवर सोडला होता. यादरम्यान प्रियकर शालिनची बाजू घेताना सुंबुल दिसून आली.