Shiv Thakare | एकेकाळी विकायचा दूध, वाचा शिव ठाकरे याचा बिग बाॅसपर्यंतचा संघर्षमय प्रवास

बिग बाॅस 16 मधील शिव ठाकरे हा अत्यंत महत्वाचा स्पर्धक होता. आज जरी शिव ठाकरे हा बिग बाॅस हिंदीमध्ये धमाल करताना दिसला असला तरीही त्याच्यासाठी हा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता.

Shiv Thakare | एकेकाळी विकायचा दूध, वाचा शिव ठाकरे याचा बिग बाॅसपर्यंतचा संघर्षमय प्रवास
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 7:03 PM

मुंबई : बिग बाॅस 16 चा फिनाले आता अवघ्या एका तासावर आलाय. कोण होणार बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता यावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. यामध्ये शिव ठाकरे याचे नाव विजेत्याच्या स्पर्धेमध्ये सर्वात पुढे आहे. सोशल मीडियावर चाहते शिव ठाकरे याला सपोर्ट करताना दिसत आहेत. अगोदर मराठी बिग बाॅसमध्ये सहभागी होत शिव ठाकरे याने बिग बाॅस मराठीची ट्रॉफी आपल्या नावावर केली. हिंदी बिग बाॅसमध्येही शिव ठाकरे याने जबरदस्त गेम खेळलाय. अर्चना गाैतम हिने एका वादामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) याचा थेट गळा पकडला होता. मात्र, यावेळी त्याने संयमाने घेत चाहत्यांचे मन जिंकले. मंडळीचा प्रमुख म्हणून शिव ठाकरे याला अनेकदा बिग बाॅसच्या घरात टार्गेट करण्यात आले. इतकेच नाही तर अनेकदा सलमान खान (Salman Khan) याने देखील विकेंडच्या वारमध्ये शिव ठाकरे  याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तरीही शिव ठाकरे याने आपला बेस्ट गेम देण्याचाच प्रयत्न केला.

बिग बाॅस 16 मधील शिव ठाकरे हा अत्यंत महत्वाचा स्पर्धक होता. आज जरी शिव ठाकरे हा बिग बाॅस हिंदीमध्ये धमाल करताना दिसला असला तरीही त्याच्यासाठी हा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता.

अत्यंत मेहनतीने शिव ठाकरे हा इंथपर्यंत पोहचला आहे. एकेकाळी शिव ठाकरे याने दूध विकत वर्तमानपत्रे देखील विकली आहेत. शिव ठाकरे याला खरी ओळख ही बिग बाॅस मराठीमधून भेटलीये.

शिव ठाकरे याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. फिनाले विकमध्ये बिग बाॅसच्या घरात टाॅर्चर टास्क पार पडला होता. यावेळी अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे, निम्रत काैर आणि एमसी स्टॅन यांच्या डोळ्यात हळद, मीठ आणि निरमा टाकला होता.

टाॅर्चर टास्क डोळ्यांमध्ये हळद जाऊनही शिव ठाकरे, निम्रत आणि एमसी स्टॅन हे जागेवरून हालले नव्हते. काही दिवसांपूर्वी अब्दु रोजिक याने म्हटले होते की, शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅन बिग बाॅसचे विजेते व्हावेत.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.