Bigg Boss 16 | या कारणामुळे बिग बाॅसच्या घरामध्ये टीना दत्ता ढसाढसा रडली, वाचा काय घडले?
श्रीजिता ही घरात आल्यामुळे टीना दत्ताला जास्त टेन्शन आले आहे.
मुंबई : बिग बाॅसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. श्रीजिता डे ही परत एकदा बिग बाॅसच्या घरात दाखल झालीये. विशेष म्हणजे श्रीजिताने घरात आल्यावर लगेचच आपले रंग दाखवण्यास सुरूवात केलीये. टीना दत्ताला श्रीजिता म्हणाली की, तुझा दिल काळा आहे…हे ऐकून सुरूवातीला टीनाचा गोंधळ उडतो. परंतू श्रीजिता ही टीनाला म्हणते की, तू माझ्याबद्दल जे काही वाईट बोलले आहे, ते सर्व आता मला समजले आहे. यावर टीना म्हणते की, मी काहीच बोलले नाहीये. यावर श्रीजिता म्हणते की तू राहू दे…मला इच्छाचाच नाहीये तुला बोलायचे आणि मला आयुष्यात कधीच बाहेर भेटू नको.
श्रीजिता डे हिच्याबद्दल आपण नेमके काय बोललो आहोत. हे टीनाच्या लक्षात येते. त्यानंतर टीना साैंदर्यासोबत झालेल्या छोट्या वादानंतर रडताना दिसते. श्रीजिता ही घरात आल्यामुळे टीना दत्ताला जास्त टेन्शन आले आहे.
टीना ही शालिन याला म्हणते की, ही फक्त आणि फक्त मलाच आता टार्गेट करणार आहे. यावर शालिन म्हणतो की तुम्ही दोघी एकमेकींना बोला आणि तुमचा प्राॅब्लेम साॅल करा. यावर टीना म्हणते की हे अजिबात शक्य नाहीये.
सलमान खान हा विकेंडच्या वारमध्ये साजिद खान याचा क्लास घेताना दिसतो. कारण या आठवड्यामध्ये साजिद खान हा बिग बाॅसच्या विरोधात बोलताना दिसला. साजिद खान घरामध्ये सर्वांसोबत चांगले राहण्याचा प्रयत्न करतोय.
Usse to sabse jyada banti hai.” And the smile on her face. ?❤️? my babies ❤️❤️#PriyAnkit #PriyankaChaharChoudhary #AnkitGupta #BiggBoss16 #BB16 pic.twitter.com/aqWJk5njvq
— Amoli ? (@Sassy__babe_) December 9, 2022
बिग बाॅसच्या घरात असलेल्या एमसीला घरात राहू वाटत नसल्याचे म्हणताना सतत दिसत आहे. मला बिग बाॅसच्या घराबाहेर जायचे असल्याचे देखील एमसी अनेकदा म्हणतो. गेल्या काही दिवसांपासून एमसी हा नाॅमिनेट आहे.
सलमान खान एमसीला म्हणतो की, तुझे चाहते तुला किती जास्त सपोर्ट करत आहेत आणि तुला का बिग बाॅसच्या घराबाहेर जायचे आहे? परंतू एमसी हा सलमान खानचे देखील ऐकत नाही.
शेवटी सलमान खान हा एमसीला म्हणतो की, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू विचार कर…आजच्या विकेंडच्या वारमध्ये बिग बाॅसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. आज सलमान खान घरातील काही सदस्यांचा क्लास घेता आहे.