Bigg Boss 16 | शालिन भनोट आणि एमसी स्टॅनवर चढला सलमान खान याचा पारा
शालिन आणि एमसी यांच्या भांडणामध्ये दोघेही प्रचंड शिव्या देतात. आता यावरून सलमान खान हा दोघांचा चांगलाच क्लास घेणार आहे.
मुंबई : विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा एमसी स्टॅन आणि शालिन भनोट यांचा क्लास घेताना दिसणार आहे. या आठवड्यामध्ये एमसी आणि शालिन भनोट यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली होती. इतकेच नाहीतर या भांडणामध्ये यांनी एकमेकांना शिव्या दिल्या होत्या. या भांडणादरम्यान घरातील सदस्यांनी या दोघांना देखील समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतू दोघेही शिव्या देत होते. टास्कदरम्यान टीना आणि एमसीमध्ये भांडणे सुरू होती. त्याचवेळी यामध्ये शालिन पडतो आणि शिव्या देण्यास सुरूवात करतो. एमसी देखील त्याला शिव्या देतो.
शालिन आणि एमसी यांच्या भांडणामध्ये दोघेही प्रचंड शिव्या देतात. आता यावरून सलमान खान हा दोघांचा चांगलाच क्लास घेणार आहे. नुकताच याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये सलमान खानचा पारा चांगलाच चढलेला दिसतोय.
View this post on Instagram
सलमान खान या भांडणाचा विषय ज्यावेळी काढतो, त्यावेळी शालिन म्हणतो की साॅरी सर…यावर सलमान खान चिडतो आणि म्हणतो साॅरी? ही भाषा तुला शोभत नाही. यावर शालिन शांत बसतो.
एमसी देखील सलमान खानला म्हणतो साॅरी सर यानंतर असे माझ्याकडून परत कधीच होणार नाही. सलमान खान म्हणतो की, तुमच्या भांडणामध्ये तुम्ही तुमच्या आई आणि बहिणींना का शिव्या देत आहात?
Script Writer of #BiggBoss16 Watch @BiggBoss episode on YouTube or Facebook only. Don’t give them TRP by watching on TV or Voot
NO ANKIT NO BIGG BOSSpic.twitter.com/rqzgICI8ly
— PriyAnkit Love Birds (@Priyankit_Union) December 23, 2022
या आठवड्यामध्ये अंकित गुप्ता हा घराच्या बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. बिग बाॅसच्या घरात अंकित काही विशेष करताना दिसत नाहीये. यामुळे अनेकदा अंकितवर टीका देखील झालीये.