Bigg Boss 16 | शालिन भनोट याच्यावर भडकला सलमान खान
गेल्या आठवड्याच्या विकेंड वारमध्ये सलमान खान याने प्रियंका चाैधरीचा क्लास घेतला होता.
मुंबई : बिग बाॅस सीजन 16 चांगलेच रंगात आले असून घरामध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा शालिन भनोट आणि अर्चना गाैतमचा क्लास घेताना दिसणार आहे. प्रेक्षकांपासून ते घरातील सदस्यांपर्यंत सर्वांनाच विकेंडच्या वाराची आतुरता असते. कारण सलमान खान हा आठ दिवस घरामध्ये नेमके काय घडले यावर प्रकाश टाकतो. गेल्या आठवड्याच्या विकेंड वारमध्ये सलमान खान याने प्रियंका चाैधरीचा क्लास घेतला होता.
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल झालाय. यामध्ये सलमान खान हा शालिन भनोट याच्यावर चिडलेला दिसतोय. कारण शालिन भनोट याने बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम हिच्याबद्दल चुकीचे शब्द वापरले होते.
Umeed ki kiran??? Is he coming back @BiggBoss ?
BB REUNITE PRIYANKA ANKIT pic.twitter.com/scGreQ8bWP
— BIGG BOSS 16 LF (@itsvibingsoul) December 30, 2022
भांडणामध्ये शालिन भनोट हा अर्चनाला असे काही बोलतो की, ते ऐकून तिचा पारा चढतो आणि ती शालिन भनोट याची एक्स पत्नी आणि आईबद्दल चुकीचे शब्द वापरते. यावर शालिन बोलत असताना सलमान म्हणतो की, तू पण तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या आहेत.
यावर शालिन म्हणतो की, मी बिग बाॅसच्या घरात आहे. मी तिच्याबद्दल चुकीचे बोलले आहे मग तिने देखील माझ्याबद्दलच बोलावे…तिने माझ्या कुटुंबियांना कशाला काही बोलायला हवे.
सलमान खान हा शालिनला समजवत असताना शालिन सलमानचे न ऐकता उलटे बोलत असल्याने सलमान खान याचा पारा चढतो हे प्रोमोमध्ये दिसत आहे. एका भांडणानंतर शालिन बिग बाॅसच्या घरातील साहित्याची मोडतोड करताना दिसला होता.