Bigg Boss 16 | सुंबुल तौकीरची अॅक्टींग पाहून सलमान खान भडकला
टीना दत्ताच्या पायाला दुखापत झाल्यानंतर शालिन तिला आराम मिळावा म्हणून प्रयत्न करत होता.
मुंबई : बिग बाॅसच्या घरात मोठा हंगामा सुरू आहे. प्रियंका चाैधरीने लावलेली आग मोठी होताना दिसत आहे. टीना दत्ताच्या पायाला दुखापत झाल्यानंतर शालिन तिला आराम मिळावा म्हणून प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा त्रास टीनाला होत असल्याचे एमसी स्टॅनच्या लक्षात आले आणि तो शालिनला म्हणाला की, हे करू नको…मात्र, यावेळी एमसीला शालिन असे काही बोलतो की, याचा प्रचंड राग एमसीला येतो आणि तो थेट शालिनला शिवी देतो. मात्र, यापूर्वी अनेकदा मित्र म्हणून शालिनने एमसीला शिवी दिली होती.
शालिन आणि एमसीचे हे भांडण इतके जास्त वाढते की, हे दोघे ऐकमेकांच्या अंगावर देखील जातात. इतकेच नाही तर यादरम्यान शालिन एमसीला पकडून देखील काही वेळ ठेवतो. एमसीला वाचवण्यासाठी शिव ठाकरे आणि साजिद खान येतात.
हे भांडत झाल्यानंतर एमसी आणि शालिन वेगवेगळ्या रूममध्ये जातात. मात्र, यावेळी प्रियंका शालिनकडे जाऊन त्याला एमसी स्टॅनविरोधात भडकून देते. यावेळी सुंबुल देखील शालिनला एमसीच्याविरोधात भडकून देत रडत बसते. हा सर्व प्रकार टीनाला अजिबात आवडत नाही.
प्रियंका आणि सुंबुल फक्त शालिनला भडकून देत असल्याचे टीनाच्या लक्षात येते आणि ती शालिनला समजवण्यासाठी रूममध्ये जाते. परंतू नेहमीप्रमाणे शालिनच्या बाजूला बसून टीनाला अजिबात काहीच सुंबुल बोलू देत नाही. यामुळे टीनाला राग येतो आणि ती सुंबुलला भांडते.
विकेंड वारमध्ये सलमान खान यासर्व गोष्टीवर बोलतो. या भांडणामध्ये सुंबुल नाटक करत असल्याचे सलमान म्हणतो आणि तिचा चांगलाच क्लास लावतो. कारण खरोखरच या भांडणामध्ये सुंबुलचे काही नसताना ती फक्त शालिनला भडकून देताना दिसते.
सलमान खानने सुंबुलचा क्लास लावल्यानंतर सुंबुलच्या चाहत्यांच्या निशाण्यावर सलमान खान आहे. बिग बाॅसच्या घरातील पहिल्या दिवसापासून सुंबुल फक्त शालिनसोबत फिरताना दिसत आहे. टीना म्हणते की, शालिन टाॅयलेटमध्ये गेला तरीही ती बाहेर थांबते.