Bigg Boss 16 | सुंबुल तौकीरवर सलमान खान भडकला…

सलमान खानला डेंग्यू झाल्याने त्याने मागच्या आठवड्याचा विकेंड वार जरी होस्ट केला नसला तरी देखील शोमधील स्पर्धकांवर सलमान खानचे बारीक लक्ष होते.

Bigg Boss 16 | सुंबुल तौकीरवर सलमान खान भडकला...
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 2:34 PM

मुंबई : सलमान खान पुन्हा एकदा नव्या जोमाने बिग बाॅस 16 ला होस्ट करताना दिसणार आहे. डेंग्यू झाल्याने सलमान खान गेल्या आठवड्यातील विकेंडच्या वारला होस्ट करताना दिसला नाही. सलमानऐवजी करण जोहरने विकेंडचा वार होस्ट केला. मात्र, ज्यापध्दतीने सलमान खान विकेंडचा वार होस्ट करतो ती मजा इतरवेळी अजिबातच येत नाही. विकेंडच्या वारला शोचा टीआरपी पण वाढतो. या आठवड्यातील विकेंडचा वार दणदणीत होणार आहे. सलमान खान विकेंडचा वार होस्ट करणार आहे.

सलमान खानला डेंग्यू झाल्याने त्याने मागच्या आठवड्याचा विकेंड वार जरी होस्ट केला नसला तरी देखील शोमधील स्पर्धकांवर सलमान खानचे बारीक लक्ष होते. आजच्या विकेंड वारमध्ये सलमान खान सुंबुल ताैकीरच्या क्लास घेताना दिसणार आहे. सलमान सुंबुलची चांगलीच खरडपट्टी काढणार असून तिच्यासोबतच प्रियंका आणि अंकितचा देखील क्लास लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी सुंबुल अर्थात इमलीला समजवण्यासाठी तिचे वडील स्वत: बिग बाॅसच्या मंचावर आले होते. यावेळी सलमान खानने देखील सुंबुलला समजवण्याचा खूप जास्त प्रयत्न केला. मात्र, हे सर्व करूनही पालथ्या घड्यावर पाणी म्हटल्याप्रमाणे सुंबुलने खेळामध्ये काहीच सुधारला केली नाहीये.

सुंबुलच्या भावनांसोबत खेळू नकोस, असे म्हणत सलमान खानने शालिनला झापले होते. शालिन सुंबुलबद्दल इतरांजवळ नेमके काय बोलतो हे सलमान खान आणि सुंबुलच्या वडिलांनी तिला अगोदरच सांगितले. तरीही सुंबुल परत तिच चूक करत असल्याने सलमान खान सुंबुलला सांगतो.

सलमान खान सुंबुलला म्हणाला की, तु इथे कशाला थांबली आहेस, शोमध्ये तू काय करत आहे…तुला इतक्या सर्व गोष्टी सांगूनही तुला काहीच कळत नाहीये. तू एकटी गेम खेळत नाहीस. तुला इतर लोकांची गरज पडत आहे. सलमान खानचे हे सर्व बोलणे ऐकून सुंबुल रडायला लागते. त्यानंतर सलमान आपल्या मोर्चा अंकित आणि प्रियंकाकडे वळवतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.