Bigg Boss 16 | सौंदर्याने असे काही बोलले की, प्रियंकाच्या अश्रूंचा बांधच फुटला
सौंदर्या गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 16 च्या घरातील वादग्रस्त खेळाडू बनलीये. कारण सौंदर्याने काही दिवसांपूर्वी घरातील टीव्ही स्टार नसलेल्या स्पर्धकांचा क्लास काढला होता.
मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. प्रेक्षकांना बिग बॉस आवडत असून निर्मात्यांनी देखील सुटकेचा निश्वास टाकलाय. कारण बिग बॉस 15 पूर्णपणे फेल गेल्यानंतर बिग बॉस 16 चे काय होणार हा प्रश्न (Question) अनेकांना पडला होता. मात्र, बिग बॉस 16 ने दणक्यात सुरूवात केलीये. घरामध्ये जोरदार हंगामा होताना दिसत आहे. सलमानने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना कोणी कोणाची काय चुगली केली हे सांगितले. यामुळे अंकित, प्रियंका आणि सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma )मध्ये जोरदार राडा झाला.
Soundarya ki baaton ne dukhaaya Priyanka ka dil, aaj #ShukravaarKaVaar mein dekhenge aap inke beech ho rahi anban⚡
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@beingsalmankhan pic.twitter.com/27Ruq7B2wQ
— ColorsTV (@ColorsTV) October 14, 2022
सौंदर्या गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 16 च्या घरातील वादग्रस्त खेळाडू बनलीये. कारण सौंदर्याने काही दिवसांपूर्वी घरातील टीव्ही स्टार नसलेल्या स्पर्धकांचा क्लास काढला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या संगोपनावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण केली होती. त्यामध्येच तिने आता अंकित आणि प्रियंकाबद्दल एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. सौंदर्या नेमके काय म्हणाली हे सलमान खानने घरातील सर्व सदस्यांना सांगितले.
सलमान खानचे बोलणे ऐकून घरातील सर्वच स्पर्धकांना मोठा धक्काच बसला. कारण सौंदर्याने यापूर्वी पर्सनल लाईफबद्दल बोलल्यामुळे मोठा हंगामा केला होता. मात्र, तिने आता अंकित आणि प्रियंकाच्या पर्सनल लाईफबद्दल असे काही बोलले की, ऐकून सर्वजण दंग राहिले. सौंदर्या म्हणाली की, अंकितसोबत जर प्रियंकाचे लग्न झाले तर अंकितच्या आईला स्वत:चा गळा दाबून घ्यावा लागेल. सौंदर्याचे हे बोलणे ऐकून सर्वचजण आर्श्चयचकित झाले.