Bigg Boss 16 | ‘सुंबुल ताैकीर’ला वाचवण्यासाठी बिग बाॅसच्या निर्मात्यांनी टाळले एलिमिनेशन
फक्त एकटी सुंबुल ताैकीर सोडली तर सर्व स्पर्धेक जबरदस्त गेम खेळताना दिसत आहेत.
मुंबई : टीव्हीवरील रिअॅलिटी शो बिग बॉस सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. बिग बाॅसच्या घरातील सर्वच स्पर्धेक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करताना दिसत आहे. फक्त एकटी सुंबुल ताैकीर सोडली तर सर्व स्पर्धेक जबरदस्त गेम खेळताना दिसत आहेत. भांडणे, मैत्री आणि वाद हे समीकरण सध्या बिग बाॅसच्या घरात बघायला मिळतंय. शिव ठाकरे, अब्दू, एमसी स्टॅन आणि साजिद खान यांनी बिग बाॅसच्या घरातून मैत्रीची एक मिसाल दिलीये. बिग बाॅस 16 च्या घराचा नवा कॅप्टन सर्वांचा आवडता अब्दू झालाय.
rare footage of shiv auditioning for naagin show ??#priyankit #ankitgupta #biggboss16 #priyankachaharchoudhary #bb16
— ᴀʟɪᴢᴇʜ (@notevenokk) November 5, 2022
पहिल्याच दिवशी स्वत: धडाकेबाज निर्णय घेत अब्दूने घरातील सर्व सदस्यांना काम वाटून दिले आहे. गोरी सध्या शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन आणि अब्दूची मैत्री तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, यांच्या मागे गोरी नेमके काय करत आहे, हे सर्वांना दाखवण्याचा एक प्रयत्न बिग बाॅसने केला आहे. विशेष म्हणजे गोरी हे सर्व गाैतम आणि प्रियंकाच्या सांगण्यावरून करते आहे.
who is your favourite contestant??#AbduRozik vs#SumbulTouqueerKhan
Retweet ?: Sumbul Like ❤️: Abdu Roziq #SumbulIsTheBoss #AbdulRozik #Shibdu #BB16 #biggboss16 pic.twitter.com/9OhZDBov5n
— ABDU ROZIK ( TURTUR ) (@AbdurozikFC09) November 4, 2022
बिग बाॅसने घरातील सर्व सदस्यांना नाॅमिनेशनसाठी एक टास्ट दिला होता. त्यावेळी या आठवड्यासाठी सुंबुल ताैकीर, साैंदर्या आणि अर्चना गाैतम नाॅमिनेट झाल्या होत्या. मात्र, सुंबुल बिग बाॅसच्या घरात काहीच करत नसताना देखील बिग बाॅसला सुंबुल हिला घराच्या बाहेर काढायचे नसल्याने टास्क देत बिग बाॅसने या आठवड्यात नाॅमिनेशन प्रक्रिया करणे टाळले आहे. यामुळे या आठवड्यात कोणीही शोच्या बाहेर पडले नाहीये.