मुंबई : बिग बाॅस १६ मध्ये फिनाले विक सुरू असून घरामध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. आता बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात फक्त सहा सदस्य आहेत. मात्र, तरीही घरामध्ये भांडणे होताना दिसतायत. मुळात म्हणजे या अगोदरच्या सीजनमध्ये फिनाले विक सुरू झाल्यानंतर घरातील सर्वच सदस्य हे प्रेमाने राहताना दिसले होते. मात्र, हे बिग बाॅसचे पहिले सीजन असावे. ज्यामध्ये घरातील सदस्य हे फिनाले (Finale) विक सुरू असताना देखील भांडणे करताना दिसत आहेत. बिग बाॅसने घरातील सदस्यांना राशनसाठी टास्क दिला होता. हा टास्क अर्चना गाैतम (Archana Gautam) हिने पुर्ण होऊन दिला नाही. तिच्या म्हणण्यानुसार बिग बाॅसच्या घरात सर्वात जास्त योगदान हे तिचे असल्याने चाैथ्या रॅंकवर जाणार नसल्याचे म्हणत पहिल्याच रॅंकवर थांबण्यासाठी अर्चना गाैतम हिने घरातील सदस्यांसोबत वाद घातला. यादरम्यान घरातील सर्व सदस्यांनी अर्चना गाैतम हिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू अर्चना गाैतम हिने कोणाचेच ऐकले नाही.
रिपोर्ट्सनुसार, मिड विकमध्ये घरातील एक सदस्य बेघर होणार आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, निमृत कौर, शालीन भानोत आणि अर्चना गौतम यांना कमी मते मिळाल्यामुळे यांच्यापैकी एकजण बेघर होणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे निम्रत काैर ही बेघर झाल्याचे सांगितले जात आहे.
फिनाले विक सुरू असताना घरामधून निम्रत काैर ही बेघर झालीये. ग्रँड फिनालेच्या अगोदर बिग बाॅसने मोठा स्ट्रोक मारला असून यामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. निम्रत काैर ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यामुळे शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे घरामध्ये आता एकटे पडले आहेत.
बिग बाॅस १६ चा विजेता कोण होणार यावर सतत चर्चा रंगताना दिसत आहे. यामध्ये शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी यांचे नाव आघाडीवर आहे आणि या दोघांपैकीच एकजण बिग बाॅसच्या विजेता होईल, अशी एक चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शिव ठाकरे हा बिग बाॅस मराठीचा विजेता आहे.
काही दिवसांपुर्वीच घरामध्ये टाॅर्चर टास्क पार पडला आहे. या टास्कमध्ये अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि निम्रत काैर यांच्या डोळ्यामध्ये मीठ, हळद आणि निरमा टाकला होता. यानंतर शिव ठाकरे याच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली होती. करण जोहर याने यावरूनच अर्चना गाैतम हिचा क्लास लावला होता.