Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या चाहत्यांना मोठा झटका, हे 3 स्पर्धेक बाहेर पडण्याची शक्यता
शालिन आणि टीनासोबत राहत असताना सुंबुल चुकीची दिसत होती. अब्दु रोजिक याचे बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासून फॅन वाढले आहेत.
मुंबई : बिग बाॅसचे १६ (Bigg Boss 16) वे सीजन धमाका करताना दिसत आहे. फॅमिली वीकमध्येही प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले जात आहे. यापूर्वी कदाचित कुठल्याच बिग बाॅस सीजनमध्ये जे बघायला मिळाले नाही ते या सीजनमध्ये बघायला मिळत आहे. बिग बाॅसच्या घरात कोणतेही नाते हे फक्त स्वार्थासाठी तयार केले जाते. मात्र, या सीजनमध्ये खरी मैत्री प्रेक्षकांना बघायला मिळालीये. शिव ठाकरे, साजिद खान, एमसी स्टॅन, अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांच्यामध्ये. इतकेच नाहीतर हे नेहमीच आपल्या मित्रांसाठी कायमच उभे असतात. शालिन आणि टीनासोबत राहत असताना सुंबुल चुकीची दिसत होती. परंतू जेंव्हापासून ती मंडळीसोबत राहत आहे, तेंव्हापासून तिचा गेमही चांगला झालाय.
नुकताच बिग बाॅसच्या घरात शिव ठाकरे याची आई, साजिद खान याची बहिण फराह खान, एमसी स्टॅन याची आई, सुंबुलचे काका, निम्रतचे वडील घरात आले होते. यावेळी फराह खान आणि जवळपास सर्वांच्याच घराच्यांनी सांगितले की, तुमच्या सर्वांची मैत्री बाहेर खूप छान दिसत आहे.
या आठवड्यामध्ये नाॅमिनेशनमध्ये निम्रत काैर, श्रीजिता डे, एमसी स्टॅन आहेत. या आठवड्यामध्ये श्रीजिता डे घराबाहेर पडणार असल्याचे सांगितले जातंय. फक्त श्रीजिता डे हिच नाहीतर साजिद खान आणि अब्दु देखील बिग बाॅसच्या घराबाहेर पडणार असल्याची चर्चा फॅन पेजवर आहे.
जर खरोखरच साजिद खान आणि अब्दु बिग बाॅसबाहेर पडले तर हा खूप मोठा धक्का नक्कीच असणार आहे. फॅन पेजवर अशी एक चर्चा आहे की, साजिद खान याच्या चित्रपटाचे काम असल्याने तो बिग बाॅसमधून बाहेर पडणार आहे.
अब्दु रोजिक याचे देखील महत्वाचे काम असल्याने तो बिग बाॅसमधून बाहेर पडेल. यापूर्वीही अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घराबाहेर तब्बल आठ दिवस होता. अब्दु रोजिक याचे बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासून फॅन वाढले आहेत.
बिग बाॅसच्या घरात झालेल्या टास्कनुसार शिव ठाकरे हा बिग बाॅसच्या घराचा नवा कॅप्टन झाला आहे. घरामध्ये टीना दत्ता आणि प्रियंका यांनी राशनवरून मोठा हंगामा केला आहे. यावेळी त्या शालिन भनोट याला भांडताना दिसत आहेत.