Bigg Boss 16 | गटातटाच्या राजकारणामुळे बिग बॉसची डोकेदुखी वाढली…

कॅप्टनसीच्या टास्कमध्ये शिव ठाकरे आणि गौतममध्ये लढत होती. मात्र, निम्रत टीव्ही स्टार्स गटाची असल्याने तिने टीव्ही स्टार्स गटातीलच गौतमला विजयी केले. कारण टीव्ही स्टार्स गटाला त्यांच्या हातून कॅप्टनसी जावू द्यायची नव्हती.

Bigg Boss 16 | गटातटाच्या राजकारणामुळे बिग बॉसची डोकेदुखी वाढली...
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 12:49 PM

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चे हे सीजन हीट ठरणार हे आता जवळपास नक्कीच आहे. यंदाचे सीजन प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन गट झाले असून यामध्ये टीव्ही स्टार्स (TV stars) आणि दुसरा गट सेलिब्रिटी नसलेले असे दोन गट झाले आहेत. यामुळे या दोन्ही गटात तुफान राडा होताना दिसतोय. टीव्ही स्टार्स सेलिब्रिटी (Celebrity) नसलेल्या गटाचा सतत क्लास काढताना दिसत आहेत. मात्र, बिग बॉसच्या घराचा कॅप्टन गौतम असल्याने तो टीव्ही स्टार्सला पाठिशी घालतोय.

कॅप्टनसीच्या टास्कमध्ये शिव ठाकरे आणि गौतममध्ये लढत होती. मात्र, निम्रत टीव्ही स्टार्स गटाची असल्याने तिने टीव्ही स्टार्स गटातीलच गौतमला विजयी केले. कारण टीव्ही स्टार्स गटाला त्यांच्या हातून कॅप्टनसी जावू द्यायची नव्हती. शिव ठाकरे याने यावर आक्षेप घेतला. मात्र, बिग बॉसने टास्कमधील सर्व अधिकार हे निम्रतकडे दिले होते. यामुळे गौतम बिग बॉस 16 चा दुसरा कॅप्टन ठरला.

बिग बॉसच्या घरातील वातावरण सातत्याने चिघळताना दिसत आहे. कारण टीव्ही स्टार्स गटातील टीना दत्ता, सुंबुल आणि सौंदर्या यांनी सेलिब्रिटी नसलेल्या गटातील सदस्यांसोबत किचनमध्ये जेवण न बनवण्याचा निर्णय घेतलाय. अर्चना चहा बनवण्यासाठी किचनमध्ये आल्याने टीना दत्ता, सुंबुल आणि सौंदर्या या थेट बाहेर गेल्या आणि आम्ही अर्चनासोबत किचनमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले.

बिग बॉसच्या 15 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच टीव्ही स्टार्स आणि सेलिब्रिटी नसलेले असे दोन गट पडले आहेत. टीव्ही स्टार्स सतत सेलिब्रिटी नसलेल्या लोकांच्या क्लास काढत त्यांच्या संगोपनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत असल्याने मोठा वाद घरात होतोय. मात्र, हे गटातटाचे राजकारण बिग बॉससाठी देखील डोकेदुखी ठरतंय. कारण याविरोधात लोकांमध्येही प्रचंड रोष वाढताना दिसतोय. याच्याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.