बिग बाॅस १६ च्या ग्रँड फिनालेच्या 2 दिवस अगोदर आपल्या आवडत्या स्पर्धेकाला विजेता करण्यासाठी या पद्धतीने करा वोट

पाच स्पर्धेक शिल्लक असून यांच्यापैकी एकजण हा बिग बाॅस १६ (Bigg Boss) चा विजेता होईल. काही दिवसांपूर्वी बिग बाॅसच्या घरात काही प्रेक्षक स्पर्धेकांचे मनोबल वाढवण्यासाठी घरात दाखल झाले होते.

बिग बाॅस १६ च्या ग्रँड फिनालेच्या 2 दिवस अगोदर आपल्या आवडत्या स्पर्धेकाला विजेता करण्यासाठी या पद्धतीने करा वोट
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 4:34 PM

मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे हे बिग बाॅसचे १६ (Bigg Boss 16)  वे सीजन आहे. बिग बाॅसच्या निर्मात्यांना सीजन १५ कडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, टीआरपीमध्ये बिग बाॅस १५ ला काहीच धमाका करता आला नाही. यामुळे यंदाच्या सीजनमध्ये निर्मात्यांनी अगोदरच कंबर कसल्याचे दिसून आले. यावेळी स्वत: बिग बाॅस मैदानामध्ये उतरले होते. बिग बाॅस सतत घरातील सदस्यांसोबत बोलताना दिसले. यंदाचे सीजन हे टीआरपीमध्ये (TRP) टाॅप राहिले. बिग बाॅसच्या घरातही मोठा हंगामा यावेळी बघायला मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक यंदा बिग बाॅसने घरात दाखल झाले. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान देखील वेगळ्याच जोशमध्ये दिसला. आता बिग बाॅसच्या घरात फक्त पाच स्पर्धेक शिल्लक असून यांच्यापैकी एकजण हा बिग बाॅस १६ (Bigg Boss) चा विजेता होईल. काही दिवसांपूर्वी बिग बाॅसच्या घरात काही प्रेक्षक स्पर्धेकांचे मनोबल वाढवण्यासाठी घरात दाखल झाले होते. बिग बाॅसच्या १६ व्या सीजनने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन केले आहे.

बिग बाॅस १६ चे विजेतेपद कोणाला मिळणार याची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. काही लोक हे एमसी स्टॅनला सपोर्ट करत आहेत तर काही प्रियंका चाैधरी आणि शिव ठाकरे यांना सपोर्ट करत आहेत.

विशेष म्हणजे आपला आवडता स्पर्धेक बिग बाॅसचा विजेता व्हावा जर तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही देखील वोट देऊ शकता. १२ फेब्रुवारी २०२३ ला विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.

विजेत्याची घोषणा होण्याच्या अगोदर साधारण १२ तास अगोदर वोटिंग लाइन बंद केल्या जातात. म्हणजे तुमच्या आवडत्या स्पर्धेकाला तुम्ही फक्त दुपारी १२ वाजेपर्यंत वोट देऊ शकता.

तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट देण्यासाठी तुम्ही एकतर Voot वरून किंवा My Jio अॅपद्वारे वोट देऊ शकता. बिग बाॅस १६ च्या ज्या स्पर्धेकाला जास्त वोट असतील तो बिग बाॅस १६ चा विजेता असणार आहे.

सोशल मीडियावर एक चर्चा आहे की, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियंका चाैधरी हे वोटमध्ये टाॅपला आहेत. कालच्या एपिसोडमध्ये बिग बाॅसच्या घरात चाहते गेल्याचे दिसत असून ते आपल्या आवडत्या स्पर्धेकाला सपोर्ट करताना दिसत आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.