Bigg Boss 16 | करण जोहरचा ‘विकेंड का वार’ ठरला खास…
बिग बाॅसने अर्चनाला शिक्षा देण्यासाठी तिला घराचा कॅप्टन बनवले आहे. मात्र, कॅप्टन बनल्यामुळे अर्चना आनंदात आहे.
मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा कालचा विकेंड का वार दणदणीत झालाय. मात्र, यावेळी सर्वांना सलमान खानची कमी जाणवली. सलमानला डेंग्यू झाल्याने सलमान काही दिवस आता बिग बाॅस शोला होस्ट करताना दिसणार नाहीये. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी सलमानऐवजी करण जोहरला (Karan Johar) शो होस्ट करण्यासाठी आणले आहे. पहिल्याच दिवशी करण जोहरने घरातील सदस्यांचा क्लास (Class) घेतला. यावेळी करणने गोरीला फटकारले. इतकेच नाही तर घरातील सदस्यांसोबत करण जोहर धमाल करताना दिसला.
बिग बाॅसने अर्चनाला शिक्षा देण्यासाठी तिला घराचा कॅप्टन बनवले आहे. मात्र, कॅप्टन बनल्यामुळे अर्चना आनंदात आहे. घरातील सर्वच सदस्य अर्चनाच्या विरोधात आहेत. इतकेच नाही तर कॅप्टनचे काहीच ऐकायचे नाही, अशी भूमिका घरातील सदस्यांनी घेतलीये. निम्रत, अब्दू, शिव आणि गाैतम घरामध्ये चाॅकलेट चोरी करताना दिसले.
View this post on Instagram
अर्चना कॅप्टन झाल्यानंतर अर्चना हटाव..अशा घोषणा देखील घरातील सदस्यांनी यावेळी दिल्या. यादरम्यान अर्चना आणि गोरीमध्ये मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले. अर्चनाला गोरी त्रास देत असताना अर्चनाने गोरीला मारले देखील. हे बघितल्यावर घरातील सर्व सदस्य चिडले आणि अर्चना विरोधात आपला मोर्चा सुरू केला.
अर्चनाच्या मागे हा सर्व गेम बिग बाॅसच्या घरात प्रियंका खेळत आहे. प्रियंकाला बिग बाॅसच्या घराची कॅप्टन बनायचे आहे. मात्र, सर्व प्रकरणात अर्चनाची चूक असताना करण जोहर गोरीलाच फटकारतो. यामुळे सोशल मीडियावर आता करण जोहरला आणि बिग बाॅस शोच्या निर्मात्यांना ट्रोल केले जात आहे.