Bigg Boss 3 Marathi Grand Finale | मीनल चौथ्या नंबरला? ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी कोणाला? सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज

Bigg Boss 3 Marathi Grand Finale | ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले रविवारी अर्थात 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि या सोहळ्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी 3’ सीझनच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येणार आहे. हा सोहळा ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वूट’वर पाहता येणार आहे.

Bigg Boss 3 Marathi Grand Finale | मीनल चौथ्या नंबरला? 'बिग बॉस मराठी 3'ची ट्रॉफी कोणाला? सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज
बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचे अंतिम स्पर्धक
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:13 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’ चा (Bigg Boss Marathi 3) ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांनी स्थान मिळवलं आहे. आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर असलेल्या विविध ट्रेण्ड्सच्या आधारे आम्ही ‘बिग बॉस मराठी 3’ चा संभाव्य विजेता कोण असेल, कुठल्या क्रमाने स्पर्धक बाद होतील, याचा एक ढोबळ अंदाज वर्तवला आहे.

विशाल फेवरेट

तिकीट टू फिनाले मिळालेला अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) ‘बिग बॉस मराठी 3’ च्या विजेतेपदासाठी फेवरेट मानला जातो. सोशल मीडियावरील विविध पोल्समध्ये विशाल निकम ‘बिग बॉस मराठी 3’ चा विजेता होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर विशालचं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. टीम बीचा म्होरक्या असलेला विशाल फेअर गेम खेळण्यासाठी आधीपासूनच ओळखला जात होता. त्यामुळे विशाल विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

जय की पराजय?

एम. टी. व्ही. स्प्लिट्सविला या रिॲलिटी शोचा विजेता असलेल्या जय दुधाणे (Jay Dudhane) याने घरातील सर्वांनाच फिटनेसचं वेड लावलं. या शोमध्ये अतिशय रागीट अशी त्याची प्रतिमा तयार झाली होती. परंतु शेवटच्या काही दिवसांमध्ये जयच्या टेम्परामेंटमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावरील विविध पोल्समध्ये जय आणि विशाल यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळते. त्यामुळे नावात जय असलेला दुधाणे विशालला मागे टाकून स्पर्धा जिंकणार, की त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागणार, याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा आहेत.

विकास झालाच पाहिजे

‘चार दिवस सासूचे’, ‘सुवासिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘बायको अशी हव्वी’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा विकास पाटील (Vikas Patil)‘बिग बॉस मराठी 3’च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये पोहोचला आहे. आपल्या दमदार खेळीने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. मात्र विकासला नेटिझन्सनी तिसरा क्रमांक दिला आहे. विशालचा खास मित्र असलेला विकास त्याच्यासोबत दिवे बंद करुन बाहेर पडणार का, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

फीमेल विनर

नारी शक्तीचा विजय असो, असं म्हणारी मीनल शाह (Meenal Shah) ही बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात टॉप 5 मध्ये पोहोचलेली एकमेव महिला स्पर्धक आहे. त्यामुळे एका अर्थाने ती फीमेल विनर ठरली आहे. एम टीव्ही रोडीज सारख्या शोमध्ये स्वतःची जागा तयार करणारी मीनल ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातही जिद्दीने लढली. सोशल मीडियावरील ट्रेण्ड्सनुसार मीनलला चौथा नंबर मिळण्याची चिन्हं आहेत.

इन्स्टंट कविता रचून सादर करणारा परफॉर्मर, डॉक्टर आणि ‘शिंदेशाही’ घराण्याची धुरा वाहणारा उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) यानेही टॉप 5मध्ये आपली जागा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. घरातील प्रत्येक मनोरंजन कार्यक्रमात उत्कर्षचा सहभाग हा अतिशय मोठा होता. कोणतेही वाद निर्माण न करता, सर्वांशी सलोख्याने वागणारा उत्कर्ष प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. मात्र महाअंतिम फेरीतून उत्कर्ष पहिला बाद होणारा स्पर्धक ठरु शकतो, असा प्रेक्षकांचा अंदाज आहे.

सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज काय सांगतो?

विशाल निकम – 28 टक्के मतांचा अंदाज जय दुधाणे – 25 टक्के मतांचा अंदाज विकास पाटील – 23 टक्के मतांचा अंदाज मीनल शाह – 17 टक्के मतांचा अंदाज उत्कर्ष शिंदे – 7 टक्के मतांचा अंदाज

कधी आणि कुठे पाहाल सोहळा?

‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले रविवारी अर्थात 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि या सोहळ्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी 3’ सीझनच्या विजेत्याला ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात येणार आहे. हा सोहळा ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वूट’वर पाहता येणार आहे.

विजेत्याला किती मिळणार बक्षीस?

विजेत्याची बक्षीस रक्कम आधी 25 लाख होती, पण आता ती 20 लाखांवर आणली गेली आहे. अलिकडे एका टास्कमध्ये, बिग बॉसने ‘टॉप 7’ घरातील सदस्यांना 25 लाखांची बक्षीस रक्कम आपापसात वाटून घेण्यास सांगितले. त्यांनी सात स्पर्धकांसाठी सात प्लेट्स दिल्या आणि प्रत्येक प्लेटवर काही रक्कम नमूद केली होती. प्लेट्समध्ये रु. 12,50,000, रु. 6,00,000, रु. 3,25,000, रु. 1,50.000 रु. 1,00,000, रु. 50,000, रु., 25000 असे त्यावर लिहिले होते.

‘बिग बॉस’ने असेही घोषित केले होते की, जर एखाद्या स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी नामांकन मिळाले, तर त्याला/तिला नियुक्त केलेली रक्कम अंतिम बक्षीस रकमेतून वजा केली जाईल. या टास्कमध्ये मीराला नॉमिनेट केले गेले आणि बक्षिसाच्या रकमेतून तिला देण्यात आलेल्या पाटीवरचे 25000 रुपये कमी झाले. त्यानंतर अनुक्रमे सोनाली पाटील 50 हजार, उत्कर्ष शिंदे 1,00,000, विकास पाटील 3,25,000  नॉमिनेट झाल्याने ही रक्कम बक्षिसाच्या रकमेतून कमी करण्यात आली. अखेरीस एकूण अंतिम बक्षीस रकमेतून 5,00,000 रुपये कमी झाले.

संबंधित बातम्या :

थांबायचा नाय आता भिडायचं हाय! 100 दिवस घरात स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले स्पर्धक

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.