Bigg Boss Marathi 3 | सुरुवातीपासूनच जिंकलेलं प्रेक्षकांचं मन, ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी मिळवत शोचा विजेता ठरला विशाल निकम!
सांगलीचा रांगडा गडी अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) याने कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ची (Bigg Boss Marathi 3) ट्रॉफी जिंकली आहे. स्प्लिट्सव्हिलाचा विजेता जय दुधाणे आणि विशाल यांच्यात शेवटचा सामना झाला होता.
मुंबई : सांगलीचा रांगडा गडी अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) याने कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ची (Bigg Boss Marathi 3) ट्रॉफी जिंकली आहे. स्प्लिट्सव्हिलाचा विजेता जय दुधाणे आणि विशाल यांच्यात शेवटचा सामना झाला होता. मात्र जनतेच्या अधिक मतांमुळे विशालने जयला हरवत या हंगामाचे विजेतेपद पटकावले. शोच्या पहिल्या एपिसोडपासून विशालने नेहमीच आपला खेळ सचोटीने खेळला आहे. मित्रासोबत असो की शत्रूसोबत, विशालने नेहमीच ‘न्याय्य’ पद्धतीने गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हाच प्रामाणिक प्रयत्न सर्वांनाच आवडला.
#BiggBossMarathi3 च्या विजेतेपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल विशाल निकमचे हार्दिक अभिनंदन!#ColorsMarathi @vishhal_n pic.twitter.com/8YlCiiZ7CR
— Colors Marathi (@ColorsMarathi) December 26, 2021
‘ग्रँड फिनाले’च्या या शर्यतीत मीरा जगन्नाथला बाहेर काढल्यानंतर या शोला अखेर त्यांचे ‘टॉप 5’ फायनलिस्ट मिळाले होते. ‘रोडीज’ फेम मीनल शाह, ‘स्प्लिट्सविला’ विजेता जय दुधाणे, अभिनेता विशाल निकम, अभिनेता विकास पाटील आणि डॉ. उत्कर्ष शिंदे ही ‘बिग बॉस मराठी 3’च्या ‘टॉप 5’ मध्ये पोहोचलेली नावं होती. या पाचपैकी प्रथम उत्कर्ष शिंदे यांना घरा बाहेर लावे लागले आणि नंतर कमी मते मिळाल्याने मीनल शहा ही एकमेव महिला सदस्य देखील घरा बाहेर पडली.
विकास पाटील ही ‘टॉप 2’च्या शर्यतीतून बाहेर!
मतांच्या बाबतीत, विकास, विशाल आणि जय यांना प्रेक्षकांची भरपूर मते मिळाली. मात्र शेवटच्या स्टॉपवर विकास या शर्यतीतून बाहेर पडला. पण, निघताना त्याने विशालला शुभेच्छा दिल्या. विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी, निर्मात्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि महेश मांजरेकर म्हणाले की, हा सीझन खूप यशस्वी झाला आहे आणि ते लवकरच या शोचा सीझन 4 घेऊन येणार आहेत. कर्करोगावर विजय मिळवल्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकर यांचेही सर्वांनी कौतुक केले.
विशालने पटकावले 20 लाखांचे बक्षीस
विशालला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसोबतच 20 लाख रुपयांचा धनादेशही निर्मात्यांनी दिला. या विजयाबद्दल विशालने देवाचे आभार मानले. याचबरोबर तो म्हणाला की, ‘बिग बॉस’मध्ये सामील झालेल्या सर्व स्पर्धकांचे देखील मला आभार मानायचे आहेत, कारण आज जो विशाल निकम उभा आहे तो केवळ त्यांच्यामुळेच! लोक त्याला ओळखत होते कारण तो या सर्व स्पर्धकांसह शोमध्ये सामील झाला होता. यासोबतच विशालने बिग बॉसच्या मंचाला सलाम केला आणि संधी दिल्याबद्दल बिग बॉस मराठीच्या मंचाचे आभार देखील मानले.
हेही वाचा :
Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!