Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) आज ग्रँड फिनाले आहे. मीरा जगन्नाथ(Meera Jagannath)नं बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्यावेळी तिनं विशाल निकम(Vishal Nikam)विषयी आपलं मत मांडलं.

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती...
मीरा जगन्नाथ, बिग बॉस मराठी सीझन 3
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 2:42 PM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) आज ग्रँड फिनाले आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale) विशाल निकम (Vishal Nikam), मीनल शाह (Meenal Shah), विकास पाटील (Vikas Patil), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) आणि जय दुधाणे (Jay Dudhane) यांनी स्थान मिळवलं आहे. आता विजेतेपदाचा मान कोणाला मिळणार, कोणते दोन स्पर्धक बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करुन अलविदा करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी मागच्या एलिमिनेशनमध्ये मीरा जगन्नाथ(Meera Jagannath)नं बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. मात्र यावेळी तिनं काही गोष्टी प्रोग्रामचे अँकर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यासमोर मांडल्या. त्यातली एक होती विशाल निकम याच्याबाबतीतली… पाहू या काय म्हणाली होती ती…

फायनलमध्ये पोहोचलेल्या कंटेस्टंटमध्ये विशाल निकम सध्या वरच्या क्रमांकावर आहे. याच्याबद्दलच मीरा काही तरी म्हणाली होती. बीग बॉसनं एलिमिनेशनची घोषणा करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर मांजरेकरांनी मात्र याबाबतची घोषणा केली. मीरा एलिमिनेट झाल्यावर तिला त्यांनी कसं वाटतंय असं विचारलं, त्यावेळी मीरा म्हणाली, की सहाजिकच वाईट वाटतंय. ती एक तगडी स्पर्धक होती. मात्र तिला स्पर्धेच्या विजयाबाबत त्यांनी विचारलं, तेव्हा ती म्हणाली, माझ्या मते विशाल निकम विजेता होऊ शकतो.

विशाल निकमबाबत ती म्हणाली, की विशाल हा स्पर्धेदरम्यान एक चांगला माणूस म्हणून वागला. त्यानं कोणत्याही टास्कच्या वेळी कोणाला चुकीचे शब्द वापरले नाहीत. कधी भांडण केलं नाही. कोणत्याही चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. असं वागला नाही, ज्यामुळे इतरांना त्रास होईल. ती म्हणाली, की माझ्या मते, बिग बॉसचा विनर होण्याचे सर्व गुण विशालमध्ये आहेत. या स्पर्धेत तो इतरांपेक्षा वेगळाच राहिलाय. आमची टीम वेगळी असली तरीसुद्धा त्याच्याशी वाद झाले नाहीत. त्याचा खेळ सकारात्मक होता. त्यामुळे तो विनर होऊ शकतो. दरम्यान वेगवेगळ्या सर्वेमध्येही विशालच पुढे दिसून येतोय. संध्याकाळी 7वाजता फायनल होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता घोषित होणार आहे.

Bigg Boss 3 Marathi Grand Finale | मीनल चौथ्या नंबरला? ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी कोणाला? सोशल मीडियावरील पोल्सचा अंदाज

Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना

Nick Jonas Christmas : ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये निक जोनास रोमँटिक, मांडीवर बसवून प्रियंका चोप्राला ‘Kiss’

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.