Bigg Boss Marathi 3 | ‘नेमकं कसं वागू कळतच नाहीय…’, ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात शिवलीला झाली भावूक!
युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने देखील या घरात एण्ट्री केली आहे. मात्र, या घरात आंनी क्षेत्रात नवखी असल्याने कसं वागू, असा प्रश्न तिला पडला आहे. घरातील स्पर्धक मीनल शाहसोबत गप्पा मारत असताना शिवलीलाने तिच्या या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता पार पडला आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले होते. आता या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.
शिवलीला झाली भावूक
युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने देखील या घरात एण्ट्री केली आहे. मात्र, या घरात आंनी क्षेत्रात नवखी असल्याने कसं वागू, असा प्रश्न तिला पडला आहे. घरातील स्पर्धक मीनल शाहसोबत गप्पा मारत असताना शिवलीलाने तिच्या या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना ती भावुक देखील झाली होती.
View this post on Instagram
यावेळी शिवलीला मीनलला म्हणाली की, ‘आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये’. त्यावर मीनल शहाने तिला समजावले की, ‘तू खूप छान वागते आहेस. सगळ्यांप्रमाणे चांगलं खेळते देखील आहेस. तुझी मतं स्पष्ट आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी नेहमी तुझ्यासोबत आहे,’ असं म्हणत मीनलने शिवलीला मिठी मारली आणि शिवलीला भावुक झाली. त्यावेळी उपस्थित विशाल निकम देखील म्हणाला की, ‘माऊली तुम्ही खूप खंबीर आहात.’
कोण आहे शिवलीला पाटील?
युवा कीर्तनकार शिवलीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. ग्रामीण भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते. तिची ही खास आणि हटके स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते. तिच्या मोठा चाहता वर्ग आहे.
शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा मोठे कीर्तनकार आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा वेगळा चाहता वर्ग बनवला होता. एवढंच नाही तर तिनं महाविद्यालयीन शिक्षणही घेतलं आहे. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं आपली कीर्तनाची आवड जोपासली त्याला खंड पडू दिला नाही. कौटुंबिक जीवनातील आगळे वेगळे प्रसंग, समाजातील काही खास गोष्टी, मधेच विनोद करत ती कीर्तन करते. त्यामुळे तिनं स्वतःची एक स्टाईल निर्माण केली आहे. ही स्टाईल प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे.
महत्त्वाचं म्हणजे तिनं आतापर्यंत 10 हजारांहून अधिक कीर्तनं केली आहेत आणि सहाजिकच तिनं घरात प्रवेश करताना सुद्धा हटके निरुपन करत प्रवेश केला. त्यामुळे आता ही युवा कीर्तनकार बिग बॉसच्या या घरात स्वत:ची वेगळी जागा कशी निर्माण करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हेही वाचा :
Sanak | विद्युत जमवाल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘सनक’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार!
KBC 13 | अमिताभ बच्चनच्या ‘केबीसी 13’ला मिळणार दुसरा करोडपती, प्रांशू जिंकेल का 1 कोटींचं बक्षीस?