Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस’च्या घरात आरोप-प्रत्यारोपांचा तास, मीनलवर निघाला स्नेहाचा राग!
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोशात सुरुवात झाली आहे. यंदा घरात भरपूर हल्लाकल्लोळ पाहायला मिळतो आहे. अवघ्या आठवड्याभरात स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. यानंतर आता अखेर एलिमिनेशन प्रक्रिया सुरु झालेली आहे.
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोशात सुरुवात झाली आहे. यंदा घरात भरपूर हल्लाकल्लोळ पाहायला मिळतो आहे. अवघ्या आठवड्याभरात स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. यानंतर आता अखेर एलिमिनेशन प्रक्रिया सुरु झालेली आहे. या आठवड्यापासून स्पर्धकांना घरा बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले जाणार आहे. दरम्यान घरात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा तास न्पाहायला मिळाला.
या आरोप-प्रत्यारोपांच्या तासांत घरातील स्पर्धक आणि अभिनेत्री स्नेहा वाघ, मीनल शहावर प्रचंड संतापलेली पाहायला मिळाली. यावेळी मीनल स्नेहाला म्हणाली की, माला ती घरात कुठलंच काम करताना दिसली नाही. तर, हे ऐकून स्नेहा प्रचंड संतापली. यानंतर मीनल म्हणाली की, मला तुम्ही कुठेही सक्रिय दिसला नाहीत. यावर चिडलेली स्नेहा म्हणाली की, आता काय मी नाचून दाखवू का तुझ्या पुढ्यात.. यावरून दोघींमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला.
पाहा प्रोमो :
View this post on Instagram
नवा टास्क जोशात रंगणार
पहिल्याच आठवड्याच्या दिवशी महेश मांजेरकर यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. ‘बा’च्या चावडीवर स्पर्धकांना शब्दांचा चांगलाच मार खावा लागला. मात्र, पहिल्याच आठवड्यातील एलिमिनेशन रद्द झाल्याने स्पर्धक देखील आनंदी झाले. पण, आता या आनंदावर लवकरच विरजण पडणार असं दिसतंय. याला कारणीभूत ठरणार आहे येत्या आठवड्यातील नवा टास्क. ‘जोडी की बेडी’ असं या नव्या टास्कचं नाव असणार आहे.
आता स्पर्धकांना चक्क या घरात एकटं फिरता देखील येणार नाहीये. येत्या आठवड्यातील हा कठीण टास्क संपूर्ण आठवडाभर चालणार आहे. यामुळेच आता स्पर्धकांना एकटं नाही तर, ‘बिग बॉस’ने निवडून दिलेल्या जोडीदारासोबतच घरात वावरावं लागणार आहे. यामुळे आता त्यांची जोडी नेमकी कोणासोबत बांधली जातेय आणि या खेळात नेमकं काय काय आव्हान असणार आहे, या विचाराने स्पर्धक देखील चिंतेत पाडलेल आहेत.
‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’
बिग बॉस आणि वाद हे तसं नवं समीकरण नाही. यावेळी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि स्पर्धक तृप्ती देसाई, अभिनेत्री सोनाली पाटील हिला ‘माझ्याशी असं बोलायचं नाही, नीट बोलायचं’, असं चढ्या आवाजात म्हणताना दिसल्या. यानंतर सोनाली देखील त्यांच्याशी भांडताना दिसली. यावेळी तिने ‘महिला’ हा विषय उचलून धरला होता. या महिलांच्या हक्कांसाठी भांडतात आणि इथे महिलांवरच कुरघोडी करतात अशा आशयाचे बोल बोलत ‘महिला, महिला, महिला आणि भांडायला पहिला…’ असा खोचक टोला तृप्ती देसाई यांना लगावला.
मराठी मनोरंजन विश्वातील 15 चर्चित नाव या घरात नांदणार आहेत. विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.
हेही वाचा :
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा गोल्डन गाऊनमध्ये ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ