Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठी 3 पर्वाची सुरुवात ग्रँड प्रीमिअरनं होणार, कुठे आणि किती वाजता पाहायचे एपिसोड

आज सांयकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे.

Bigg Boss Marathi 3 :  बिग बॉस मराठी 3 पर्वाची सुरुवात ग्रँड प्रीमिअरनं होणार, कुठे आणि किती वाजता पाहायचे एपिसोड
Bigg Boss Marathi 3
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 11:51 AM

मुंबई: बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे. 19 सप्टेंबर म्हणजे आजच ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वर बिग बॉसचा शानदार प्रोमो रिलीज करण्यात आला होता.

सांयकाळी 7 वाजता ग्रँड प्रीमिअर

आज सांयकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रीमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सीझनची थीम आहे.

मराठीतील 15 सेलिब्रेटींचा सहभगा

बिग बॉस मराठी कार्यक्रमात इतर बिग बॉस कार्यक्रमाप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील 15 सेलिब्रेटी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील. शोचा प्रीमियर आज म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर होणार आहे. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दररोज रात्री होईल याशिवाय वूटवर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे देखील हा कार्यक्रम पाहायला मिळेल.

प्रेक्षकांनाही संधी मिळणार

या हंगामात, मतदानासह, दर्शकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना ‘तुमचा प्रश्न’ द्वारे काही प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना ‘चुगली बूथ’ द्वारे संदेश पाठवण्याची संधी मिळेल. ते ‘व्हिडीओ विहार’ द्वारे इतर चाहत्यांसोबत त्यांची मते मांडू शकतात.

महेश मांजरेकर यांची कर्करोगावर मात

काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला होता. यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे ठीक असून, ते कर्करोग मुक्त झाले आहेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या लेकीने देखिल त्यांची हेल्थ अपडेट शेअर केली होती. दरम्यान याच काळात त्यांनी ‘बिग बॉस 3’चे शूटिंग सुरु केले होते.

कोणाकोणाला झाली विचारणा?

‘बिग बॉस मराठी 3’च्या आलिशान घरात राहण्यासाठी काही कलाकारांना विचारणा झाल्याची माहिती समोर येत आहे. या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलका कुबल यांचा देखील समवेश आहे. अलका कुबल यांनी यंदाचा सीझनमध्ये या घरात प्रवेश करावा यासाठी त्यांना ही ऑफर देण्यात आली होती. तर. ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार हिला देखील ‘बिग बॉस मराठी 3’साठी विचारणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, आगरी कोळी गीतांचे बादशाह अशी ज्यांची ओळख आहे, ते गायक संतोष चौधरी देखील या पर्वात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे.

याव्यतिरिक्त ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील ‘अपर्णा’ अर्थात अभिनेत्री अंकिता निक्रड ही देखील यंदाच्या पर्वाचा भाग असणार असल्याचे कळते आहे. सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून ‘अपर्णा’च्या पात्राला तात्पुरते बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे ही अभिनेत्री आता बिग बॉसच्या घरत दिसण्याची शक्यता वाढली आहे.

इतर बातम्या:

Bigg Boss Marathi | कुणी बनलंय युट्युबर तर, कुणी करतंय प्रेक्षकांचं मनोरंजन! पाहा ‘बिग बॉस मराठी’चे स्पर्धक सध्या काय करतात…

Bigg Boss Marathi 3 | ‘आता घराघरांत एकच डिमांड, ऐकू येऊ दे बिग बॉसची कमांड!’, ‘बिग बॉस मराठी 3’चा नवा प्रोमो पाहिलात?

Bigg boss marathi 3 read to know where and when you can watch mahesh manjrekars reality show in Marathi

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.