Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं काय घडलं की, 5 लाखांची बॅग उचलून आविष्कार घराबाहेर जायला तयार झाला?

‘बिग बॉस चावडी’वर महेश मांजरेकर यांनी घरातील स्पर्धकांसमोर तीन बॅग ठेवल्या होत्या. या बॅग्सपैकी एका बॅगेत 5 लाख रुपये असून, हे पैसे घेऊन ज्या स्पर्धकाला वाटत आपण घराबाहेर जावं, असं वाटत असेल त्याने जावं, असं महेश मांजरेकर म्हणाले.

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं काय घडलं की, 5 लाखांची बॅग उचलून आविष्कार घराबाहेर जायला तयार झाला?
Avishkar Darvhekar
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 1:17 PM

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यात रोज नवा ड्रामा आणि स्पर्धकांचे नवे कारनामे पाहायला मिळत आहेत. नुकताच आठवड्याच्या शेवटच्या भागात अर्थात ‘बिग बॉस चावडी’वर एक नवा ड्रामा पाहायला मिळाला. चावडीच्या दिवशी महेश मांजरेकर एक नवा टास्क दिला होता. यावेळी घरात एक नवा खेळ पाहायला मिळाला.

‘बिग बॉस चावडी’वर महेश मांजरेकर यांनी घरातील स्पर्धकांसमोर तीन बॅग ठेवल्या होत्या. या बॅग्सपैकी एका बॅगेत 5 लाख रुपये असून, हे पैसे घेऊन ज्या स्पर्धकाला वाटत आपण घराबाहेर जावं, असं वाटत असेल त्याने जावं, असं महेश मांजरेकर म्हणाले. यावेळी या पेटीतील रक्कम स्वीकारत स्पर्धक-अभिनेता आविष्कार दारव्हेकर याने ही पेटी उचलून घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. या नियमाप्रमाणे तो बॅग उचलून मुख्य दरवाज्याकडे गेला देखील, मात्र तिथेच त्याला महेश मांजरेकर यांनी अडवले आणि हातातील बॅग उघडून पाहण्यास सांगितले. ही बॅग उघडताच त्यात पैसे नसून, नुसतेच कागद भरलेले होते.

आविष्कार नाराज का?

कसलाही विचार न करता घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केलेल्या आविष्कारला या मागचं कारण विचारातच त्याने त्याची नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. घरात सतत आविष्कारवर विनोद केले जातात. त्याला हिणवले जाते, असे तो म्हणाला. काही टास्क दरम्यान त्याला ‘छकुला’ बोलून चिडवण्यात आलं, तर कधी त्याच्या केसांच्या विगविषयी कॅमेरावर बोलण्यात आले. यामुळे त्याला वाईट वाटल्याचे देखील त्याने बोलून दाखवले. अर्थात या सगळ्या घटनांनमध्ये त्याचे पहिले बोट हे माजी पत्नी स्नेहाकडे होते. अर्थात स्नेहाच सगळ्या गोष्टी इतर स्पर्धकांना सांगते, असा त्याचा अप्रत्यक्ष आरोप होता.

शिवलीला परतणार नाही!

कुठलेही एलिमिनेशन किंवा स्पर्धेमुळे शिवलीला बाहेर पडलेली नसून, तब्येत ठीक नसल्याने तिला वैद्यकीय उपचारांसाठी हे घर सोडावे लागले आहे. ‘या आठवड्यातील नॅामिनेटेड सदस्या शिवलीला पाटील यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या काही काळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॅासच्या घराबाहेर असतील. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद असतील याची कृपया नोंद घ्यावी’, असे म्हणत एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. मात्र, प्रकृती सुधार्ल्यानान्त्र ती परतेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, तिने याला नकार दिला आहे, या पुढे शिवलीला ‘बिग बॉस’च्या घरात जाणार नाहीये.

कोण आहे शिवलीला पाटील?

युवा कीर्तनकार शिवलीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. ग्रामीण भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते. तिची ही खास आणि हटके स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते. तिच्या मोठा चाहता वर्ग आहे.

हेही वाचा :

प्रेमाची आठवण बनून राहणाऱ्या नात्यांना घातलेली बदल्याची आर्त साद, वैभव तत्ववादीच्या ‘ग्रे’ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती!

‘सुशांतच्या मृत्यूचे रहस्य सर्वांना ठावूक…’, अभिनेत्री पायल घोषने देशाच्या कायदाव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.