Vishal Nikam: ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता विशाल निकमचा नवा अल्बम; ‘तू संग मेरे’ म्हणत दिली प्रेमाची कबुली

‘तू संग मेरे रंग भरे... कहने दे जो दिल ये कहे... हाथ ये तेरा हाथ में... मेरे साथ ये ऐसा रहे...' असे बोल असलेल्या या गीतातून त्याची दिशासोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री चाहत्यांना दिसणार आहे.

Vishal Nikam: 'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकमचा नवा अल्बम; ‘तू संग मेरे’ म्हणत दिली प्रेमाची कबुली
Vishal Nikam: 'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकमचा नवा अल्बमImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 8:22 AM

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 3) विजेता अभिनेता विशाल निकमच्या (Vishal Nikam) मनात सध्या कुणीतरी घर केलंय. त्याच्या मनातील ती व्यक्ती कोण हे लवकरच त्याच्या चाहत्यांना समजणार आहे. ‘तू संग मेरे’ असं म्हणत त्याने आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली आहे. व्हिडीओ पॅलेसची निर्मिती असलेल्या ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक अल्बममध्ये विशाल झळकणार आहे. या अल्बममध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा परदेशी दिसणार आहे. ‘तू संग मेरे रंग भरे… कहने दे जो दिल ये कहे… हाथ ये तेरा हाथ में… मेरे साथ ये ऐसा रहे…’ असे बोल असलेल्या या गीतातून त्याची दिशासोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री चाहत्यांना दिसणार आहे. रोहितराज कांबळे याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे याने स्वरबद्ध केलं आहे. काश्मीरच्या (Kashmir) नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेल्या या गाण्याचं दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केलं आहे. तर छायांकन अमोल गोळे यांचं आहे.

आपल्या पहिल्या हिंदी अल्बमविषयी विशाल सांगतो, “या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी खूप महत्त्वाची आहे.” अभिनेत्री दिशा परदेशी सांगते की, मी या शूटदरम्यान एक वेगळा अनुभव घेतला. आमची लव्हेबल जोडी आणि हे रोमँटिक गाणं सर्वांना नक्कीच आवडेल.”

हे सुद्धा वाचा

विशालच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास बिग बॉसच्या घरातच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला होता. सौंदर्या हे नाव घेत त्याने अनेकदा त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. मात्र ही सौंदर्या नेमकी कोण आहे, हे कोणालाच कधी कळू शकलं नाही. विशालच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरही शोधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याचं नाव त्याच्या सहकलाकारांशी जोडलं. ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतील अक्षया हिंदळकर हीच विशालची सौंदर्या असल्याची मध्यंतरी चर्चा होती. मात्र विशालने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना अशा अफवा पसरवू नका, अशी विनंती केली. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. ज्या सौंदर्याचा उल्लेख तो बिग बॉसच्या घरात करायचा, आता मात्र तिच्याशी काहीच संपर्क नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.