Bigg Boss Marathi 3 | Shocking! टिकटॉक स्टार सोनाली पाटील ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाद?

मीनल कॅप्टन असल्याने तिला सर्वात आधी टाईमबॉम्ब देऊन स्पर्धकाला नॉमिनेट करण्याची संधी होती, त्यानुसार तिने सर्वात कमी रक्कम डोक्यावर असलेल्या मीराला नॉमिनेट केलं. मीराने सोनालीला, सोनालीने उत्कर्षला, तर उत्कर्षने विकासला व्होट दिलं. त्यामुळे हे चौघं जण नॉमिनेट झाले.

Bigg Boss Marathi 3 | Shocking! टिकटॉक स्टार सोनाली पाटील 'बिग बॉस मराठी 3'मधून बाद?
Sonali Patil
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 9:21 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी 3’ ची (Bigg Boss Marathi 3) स्पर्धा अंतिम टप्प्यावर आली आहे. सात स्पर्धकांपैकी एकाच्या एलिमिनेशननंतर सहा जणांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार आहे. विशाल निकम (Vishal Nikam), मीनल शाह (Meenal Shah), विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि सोनाली पाटील या सात स्पर्धकांमध्ये कांटे की टक्कर सुरु होती. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातून एक धक्कादायक बातमी आली आहे. टिकटॉक स्टार आणि अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil) ‘बिग बॉस मराठी 3’च्या स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सर्वच सदस्यांना मोठा धक्का

सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी घोषणा केल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना मोठा धक्का बसला. सोनाली पाटीलच्या चाहत्यांसाठीही हा मोठा शॉक आहे. टिकटॉकमुळे लोकप्रिय झालेल्या सोनाली पाटीलचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. आतापर्यंत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चाहत्यांनी तिला मोठी साथ दिली होती. मात्र अंतिम सहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात तिला यश आलेले नाही.

कोण आहे सोनाली पाटील?

वैजू नंबर वन या मालिकेमधून टिकटॉकच्या दुनियेतून आलेल्या सोनालीने टेलिविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर देवमाणूस मालिकेतील अॅडव्होकेटची साकारलेली भूमिकाही प्रचंड गाजली होती. मालिकेतून तिने एक्झिट घेतली आणि ती दिसली थेट ‘बिग बॉस मराठी 3’च्या मंचावर. या स्पर्धेत तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मीनलसोबत सोना-मोनाची जोडी लोकप्रिय ठरली होती. शेवटच्या काही आठवड्यात मात्र विशालसोबत वारंवार उडणाऱ्या खटक्यांमुळे ती काहीशी हिरमुसली होती.

विजेत्याला वीस लाखांची रक्कम

यंदा ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेत्याला वीस लाखांची रक्कम मिळणार आहे. एलिमिनेशन टास्कसाठी सात जणांमध्ये 25 लाख ही विजेतेपदाची मूळ रक्कम विभागून देण्यात आली होती. सर्व स्पर्धकांनी चर्चा केल्यानंतर विशालला 12 लाख 50 हजार, मीनलला 6 लाख, विकासला 3 लाख 25 हजार, जयला 1 लाख 50 हजार, उत्कर्षला 1 लाख, सोनालीला 50 हजार तर मीराला 25 हजार अशा रकमांची पाटी गळ्यात टाकण्यास देण्यात आली होती. जे स्पर्धक नॉमिनेट होतील, त्यांच्याकडील पाटीवरील रक्कम विजेतेपदाच्या धनराशीतून कमी होणार होती.

मीनल कॅप्टन असल्याने तिला सर्वात आधी टाईमबॉम्ब देऊन स्पर्धकाला नॉमिनेट करण्याची संधी होती, त्यानुसार तिने सर्वात कमी रक्कम डोक्यावर असलेल्या मीराला नॉमिनेट केलं. मीराने सोनालीला, सोनालीने उत्कर्षला, तर उत्कर्षने विकासला व्होट दिलं. त्यामुळे हे चौघं जण नॉमिनेट झाले. तर त्यांच्या पाटीवर असलेली एकूण पाच लाखांची रक्कम वजा झाली. त्यामुळे यंदा ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेतेपदाला वीस लाखांची रक्कम मिळणार आहे.

सहा जणांमध्ये अंतिम स्पर्धा

सोनालीच्या एलिमिनेशननंतर विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या सहा जणांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार आहे. विशाल, मीनल आणि जय हे तिघेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. अर्थात विकास, मीरा आणि उत्कर्षही त्यांना टफ फाईट देऊ शकतात. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची ट्रॉफी कोण उंचावणार, हे पुढच्याच रविवारी समजेल.

संबंधित बातम्या :

ओम-स्वीटूचं लग्न ते देवमाणूस 2चा महाआरंभ, मनोरंजनाची मेजवानी घेऊन भेटीला येणार वर्षातला सर्वात मोठा सुपर संडे!

मैत्रीसाठी काहीही..! पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीनं दिले दागिने

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....