बिग बाॅसने खेळला मोठा गेम, अर्चना गाैतम लागली ढसाढसा रडायला
यावेळी बिग बाॅसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना थोडा हटके टास्क दिला आहे. यामध्ये घरामध्ये दोन व्यक्ती येतात.
मुंबई : नुकताच बिग बाॅसचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिग बाॅसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला आहे. हा टास्क आठवड्याच्या राशनसाठी देण्यात आलाय. बिग बाॅसच्या घरातील सदस्य इतर कोणते टास्क मन लावून करू किंवा नको. परंतू राशनचा टास्क फार मन लावून कायचम करतात. मात्र, यावेळी बिग बाॅसच्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना थोडा हटके टास्क दिला आहे. यामध्ये घरामध्ये दोन व्यक्ती येतात.
बिग बाॅसच्या घरात आलेल्या या दोन लोकांना घरातील सदस्यांना कोणताच रिप्लाय द्यायचा नाही, हाच टास्क आहे. यामध्ये हे दोन्ही व्यक्ती घरातील सदस्यांच्या जवळ येत काहीतरी खात आहेत. परंतू असे असूनही त्यांना रिप्लाय द्यायचा नाहीये.
View this post on Instagram
बिग बाॅसच्या घरातील सदस्यांसाठी त्यांच्या घरच्यांनी काही मेसेज पाठवले आहेत. मात्र, हे वाचताना काही रिप्लाय करायचा नाही किंवा डोळ्यांमधून पाणी देखील येऊद्याचे नाही. जर असे झाले तर राशनची टोपली ही घरातील सदस्यांना मिळणार नाहीये.
शेवटी एक टोपली राहते आणि दोन पत्र राहतात. यावर बिग बाॅस म्हणतात की, प्रियंका आणि अर्चना यांच्यापैकी एकाला चिठ्ठी मिळणार आहे. कारण राशनची टोपली एक आहे आणि चिठ्ठ्या दोन…
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अर्चना रडताना दिसत आहे. अर्चना म्हणते की, प्रियंका माझ्यासाठी पनौती आहे. माझी मैत्रिण नाहीये. बिग बाॅस सर्वांना चिठ्ठ्या दिल्या फक्त मलाच नाही…म्हणत अर्चना रडते.