Bigg Boss 16 | ‘सुंबुल ताैकीर’च्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी बिग बाॅसने खेळला मोठा गेम

तब्येत खराब असल्याचे कारण देत सुंबुलच्या वडिलांनी बिग बाॅसला सुंबुलला काॅल करण्यास सांगितले.

Bigg Boss 16 | 'सुंबुल ताैकीर'च्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी बिग बाॅसने खेळला मोठा गेम
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 10:50 PM

मुंबई : बिग बॉस 16 मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घराबाहेर देखील एक नवे बिग बाॅस खेळणे सुरू आहे. याला सुरूवात सुंबुल ताैकीर खानच्या वडिलांनी केली. यानंतर मग काय शालिन भनोट आणि टीना दत्ताच्या आईने देखील जोरदार उत्तर दिले. तब्येत खराब असल्याचे कारण देत सुंबुलच्या वडिलांनी बिग बाॅसला सुंबुलला काॅल करण्यास सांगितले. विशेष म्हणजे ही विनंती बिग बाॅसने देखील मान्य केली. सुंबुलच्या वडिलांनी यावेळी सुंबुलसोबत काॅलवर बोलताना शालिन आणि टीनावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. इतकेच नाही तर बाहेर काय सुरू आहे हे ही सुंबुलच्या वडिलांनी सांगितले आहे.

मुळात म्हणजे बिग बाॅसच्या घरात एकदा दाखल झाल्यानंतर बाहेर काय सुरू आहे, हे घरातील सदस्यांना अजिबात सांगितले जात नाही. मात्र, हे असूनही सुंबुलच्या वडिलांनी बाहेरील गोष्टी सुंबुलला सांगितल्या.

हे सर्व संभाषण टीव्हीवर दाखवण्यात आले. यामध्ये सुंबुलच्या वडिलांनी शालिन आणि टीनावर टिका केली होती. हे पाहून शालिनच्या वडिलांचा आणि टीनाच्या आईचा चांगलाच पारा चढला. मग काय त्यांनीही टीका केली.

सुंबुल बाहेर अत्यंत खराब दिसत असल्याचे यापूर्वी सलमान खान याने सुंबुलला 100 वेळा सांगितले आहे. इतकेच नाही तर तिच्या वडिलांना देखील बिग बाॅसच्या मंचावर आणले होते, सुंबुलला समजवण्यासाठी.

सुंबुलचा गेम सुधारण्यासाठी इतके जास्त प्रयत्न बिग बाॅसकडून केले जात असताना सुंबुलचा गेम अजिबातच सुधारला नाहीये. इतक्या लोकांनी तिला समजावूनही तिने तिच्या गेममध्ये काहीच सुधारणा केली नाहीये.

अजूनही सुंबुल बिग बाॅसच्या घरात शालिनच्या मागे फिरत आहे. शेवटी सुंबुलचा गेम सुधारण्यासाठी आता बिग बाॅसनेच मोठा गेम केला आहे. सुंबुलचा खास मित्र फहमान खान याला शोमध्ये पाठवले आहे.

सुंबुलचा गेम सुधारण्यासाठी बिग बाॅस ज्याप्रकारे मेहनत घेत आहे, हे पाहून अनेकांनी टीका केली आहे. इतकेच वाटत असेल तर हिला बिग बाॅस 16 ची ट्रॉफी द्या, असेही अनेकांनी म्हटले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.