बॉलीवूडच्या खिलाडीकडून श्रेया बुगडेचं तोंडभरून कौतुक, खास मोबाईल फोन दिला गिफ्ट!

खिलाडी कुमारने अभिनेत्री श्रेया बुगडेला मोबाईल गिफ्ट दिला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

बॉलीवूडच्या खिलाडीकडून श्रेया बुगडेचं तोंडभरून कौतुक, खास मोबाईल फोन दिला गिफ्ट!
श्रेया बुगडे, अक्षय कुमार,
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 10:35 AM

मुंबई : चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) हा कार्यक्रम सगळ्यांना भरभरून हसवतो. अनेक चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी या कार्यक्रमात हजेरी लावतात. अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बच्चन पांडे (Bacchan Pandey) हा सिनेमा 18 मार्चला रिलीज होणार आहे. चला हवा येऊ द्याच्या आज आणि उद्याच्या भागात या सिनेमाची टीम प्रमोशनसाठी येणार आहे. याचे प्रोमो सध्या आऊट झाले आहेत. यात खिलाडी कुमारने अभिनेत्री श्रेया बुगडेला (shreya bugade) मोबाईल गिफ्ट दिला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. श्रेयानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.

अक्षयकडून श्रेयाला मोबाईल गिफ्ट

अक्षय कुमार आणि बच्चन पांडे सिनेमातील इतर कलाकारांची टीम चला हवा येऊ द्याच्या मंचावर प्रमोशनसाठी आली. यावेळी त्यांनी खूप धमाल मस्ती केली. यावेळी अक्षय कुमारने श्रेयाला मोबाईल गिफ्ट दिला. त्याचं कारणही तसंच खास आहे. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवर ती नेहमी वेगवेगळे फोटो व्हीडिओ शेअर करत असते. पण यात ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील फोटो शेअर करत नाही असं अक्षयचं म्हणणं आहे. ती तिचा नवा कार्यक्रम किचन कलाकारमधलेच फोटो शेअर करते, असा त्याचा आक्षेप आहे.

श्रेयाने इथून पुढे चला हवा येऊ द्यामधले फोटो शेअर करावेत म्हणून त्याने हा फोन तिला गिफ्ट दिला आहे. या अनोख्या गिफ्टमुळे श्रेयाही भारावून गेली. चला हवा येऊ द्याच्या मंचावर एकच हश्या पिकला.

अक्षयने श्रेयाला एक विशेष कॉम्प्लिमेंटही दिली. “तु विद्या बालनसारखी दिसतेस”, असं अक्षय म्हणाला. त्यावर श्रेयाने जावेद अख्तर यांनीही असं म्हटल्याचं अक्षयला सांगितलं.

संबंधित बातम्या

16 वर्षांच्या संसारानंतर पहिली पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट, 15 वर्षानंतर किरण रावपासून विभक्त, आमिर खानची अजब प्रेमाची गजब गोष्ट’

लोकं मित्रांच्या शिफारशी करतात, मग मला काम कसं मिळेल?; झरीन खानचा सवाल

‘चावडी पुन्हा एकदा भरली, पण..’; ‘बिग बॉस मराठी 3’चे स्पर्धक आले एकत्र

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.