Kartik Aaryan | निम्रत काैर अहलुवालिया हिचे काैतुक करण्यापासून स्वत: ला रोखू शकला नाही कार्तिक आर्यन, म्हणाला
बिग बाॅसच्या घरात अनिल कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या आगामी वेब सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी अनिल कपूर बिग बाॅसच्या घरात आले होते.
मुंबई : बिग बाॅस १६ चांगलेच रंगात आले असून घरातील स्पर्धेक मोठा हंगामा करताना दिसत आहेत. बिग बाॅसच्या फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरातील प्रत्येक सदस्य जिंकण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी यांचा क्लास लागणार हे नक्कीच होते. सोशल मीडियावरही युजर्सच्या निशाण्यावर टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी होत्या. शालिन भनोट याची तब्येत खराब असताना देखील टीना आणि प्रियंका त्याला त्रास देताना घरामध्ये दिसल्या होत्या. विशेष म्हणजे शालिन भनोट हा त्यांना काहीच रिप्लाय देत नसताना देखील कारण नसताना त्या शालिन भनोट याला भांडत होत्या. यामुळेच आता विकेंडच्या वारमध्ये फराह खान ही प्रियंका आणि टीना यांचा क्लास घेताना दिसली. इतकेच नाहीतर टीना दत्ता हिला फराह खान (Farah Khan) म्हणाली की, टीना लोकांचा फक्त वापर करते.
बिग बाॅसच्या घरात सुरूवातीला शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यामध्ये लव्ह अॅगल दिसला होता. मात्र, अचानकच यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि नेहमीप्रमाणे काहीच देणे घेणे नसताना प्रियंकाने यामध्ये उडी घेतली.
प्रियंका चाैधरी ही शालिन आणि टीना यांच्या वादामध्ये पडल्यानंतर यांचा वाद अधिकच वाढला. शेवटी आता बिग बाॅसच्या घरात टीना आणि शालिन एखाद्या शत्रूसारखे वागताना दिसले.
नुकताच बिग बाॅसच्या घरात चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आला होता. कार्तिक आर्यन याने घरातील सदस्यांसोबत फुल धमाल केल्याचे दिसत आहे.
यावेळी कार्तिक आर्यन याने निम्रत काैर अहलुवालिया हिचे काैतुक केले आहे. फिनाले तिकिट सध्या निम्रतकडे असल्याने त्याने निम्रतला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या बिग बाॅसच्या घराची कॅप्टन निम्रत आहे.
बिग बाॅसच्या घरात कोणताही टाॅस्क असो अर्चना गाैतम ही शिव ठाकरे याला टार्गेट करताना दिसते. गेल्या एपिसोडमध्येच अर्चना गाैतम आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसले.
बिग बाॅसच्या घरात अनिल कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या आगामी वेब सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी अनिल कपूर बिग बाॅसच्या घरात आले होते. यावेळी अनिल कपूर हे एमसी स्टॅन याच्यासोबत मस्ती करताना दिसले.