Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MC Stan | टॉप 5 मध्ये एन्ट्री, कोट्यावधीची ज्वेलरी जाणून घ्या एमसी स्टॅन याच्याबद्दल, होऊ शकेल बिग बाॅस 16 चा विजेता?

एमसी स्टॅन आणि शालिन भनोट यांच्यामध्ये वाद झाल्याचे देखील बघायला मिळाले. जसा जसा फिनाले जवळ येतोय तसे घरातील सदस्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळत आहे.

MC Stan | टॉप 5 मध्ये एन्ट्री, कोट्यावधीची ज्वेलरी जाणून घ्या एमसी स्टॅन याच्याबद्दल, होऊ शकेल बिग बाॅस 16 चा विजेता?
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 2:31 PM

मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान एका नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हे नाव दुसरे तिसरे कोणाचे नसून एमसी स्टॅनचे (MC Stan) आहे. बिग बाॅसच्या घरात काही दिवसांपूर्वी घरी जायचे म्हणून सतत सलमान खान आणि बिग बाॅसच्या मागे एमसी स्टॅन लागला होता. घरातील एक वादानंतर बिग बाॅसने एमसी स्टॅनला नाॅमिनेशनमध्ये टाकले होते. सतत नाॅमिनेशनमध्ये राहूनही एमसी स्टॅन बेघर झाला नाही. बिग बाॅसच्या घराबाहेर एमसी स्टॅनची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे. यामुळेच अजूनही एमसी स्टॅन हा बिग बाॅसच्या घरात आहे. शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्यासोबत एमसी स्टॅन याचे नाव विजेतेपदासाठी चर्चेत आहे. मात्र, माझ्या भावाला बिग बाॅसचे विजेतेपद मिळाले असे अनेकदा एमसी स्टॅन बोलताना दिसला आहे. काही दिवसांपूर्वीच घरामध्ये काही प्रेक्षक घरातील सदस्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोहचले होते. यावेळी अनेकांनी सांगितले की, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनची जोडी आम्हाला प्रचंड आवडत आहे.

बिग बाॅस १६ मध्ये फिनाले विक सुरू असतानाच घरात हंगाना होताना दिसत आहे. काल बिग बाॅसच्या घरात काही मीडियावाले घरातील सदस्यांना प्रश्न विचारण्यास पोहचले होते. यावेळी शालिन भनोट या एमसी स्टॅनवर चिडलेला दिसता.

शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन दोघे एकमेंकांना बोलत असताना शालिन भनोट शांत बसण्यास सांगतो. यानंतर घरामध्ये गेल्यावर एमसी स्टॅन शालिन भनोट याला म्हणतो की, भाई मी तुला काहीच बोललो नव्हतो. तरीही तू माझ्यावर का चिडला होता?

एमसी स्टॅन आणि शालिन भनोट यांच्यामध्ये वाद झाल्याचे देखील बघायला मिळाले. जसा जसा फिनाले जवळ येतोय तसे घरातील सदस्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळत आहे. शिव ठाकरे याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसत आहेत.

अनेकांनी थेट बिग बाॅसवर भेदभावाचा आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चाैधरीवर बिग बाॅस फोकस करून तिला विजेता बनवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे.

आपण बिग बाॅसच्या घरात कायमच एमसी स्टॅनच्या महागड्या कपड्यांबद्दल आणि त्याच्या गळ्यातील चेनबद्दल चर्चा ऐकली असेल. काही दिवसांपूर्वी एमसी स्टॅन याने बिग बाॅसच्या घरात तब्बल ८० हजारांचा बूट घातला होता. बिग बाॅसच्या घरात देखील एमसी स्टॅन कायमच गळ्यात मोठी ज्वेलरी देखील घालतो, ज्याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे.

एमसी स्टॅन घरामध्ये दाखल ज्यावेळी झाला होत्या, तेंव्हा त्याच्या फार ओळखी नक्कीच नव्हता. मात्र, बिग बाॅसच्या घरात त्याला साजिद खान, शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकसारखे मित्र मिळाले आहेत. एमसी स्टॅन याचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.