‘कोण होणार करोडपती’च्या ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी; तुम्ही देऊ शकाल का ‘या’ 5 प्रश्नांची उत्तरं?

'कोण होणार करोडपती'चा (Kon Honaar Crorepati) नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

'कोण होणार करोडपती'च्या 'हॉट सीट'वर बसण्याची संधी; तुम्ही देऊ शकाल का 'या' 5 प्रश्नांची उत्तरं?
Kon Honaar CrorepatiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:05 PM

बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा ‘कोण होणार करोडपती’चा (Kon Honaar Crorepati) नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचवू शकतं, हे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत. मागच्या पर्वामध्ये सचिन खेडेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना आपलंस करून घेतलं होतं. त्याआधी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. या नव्या सिझनच्या नोंदणीसाठी सूत्रसंचालक सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना शोच्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणार आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित आहेत का?

  1. “पुष्पा, पुष्पराज, मै झुकेगा नही…” ही प्रसिद्ध ओळ ‘पुष्पा द राइज’ चित्रपटात कोणत्या अभिनेत्याने म्हटली आहे? A- अल्लू अर्जुन, B- राणा डग्गुबती, C- ज्युनिअर एन टी आर, D- प्रभास
  2. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला कोणाचे नाव देण्यात आले? A- प्रबोधनकार ठाकरे, B- यशवंतराव चव्हाण, C- आचार्य अत्रे, D- स्वातंत्र्यवीर सावरकर
  3. पुढीलपैकी कोणते पात्र पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील नाही? A- सखाराम गटणे, B- नारायण, C- अंतू बर्वा, D- चिमणराव
  4. 24 नोव्हेंबर 2021 ला दक्षिण आफ्रिकेने जलद पसरणाऱ्या सार्स कोव्हीड 2च्या कोणत्या नव्या प्रकाराबद्दल जागतिक आरोग्य संस्थेला माहिती दिली? A- डेल्टा, B- लॅम्बडा, C- एप्लिलॉन, D- ओमिक्रॉन
  5. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? A- शिवनेरी, B- पुरंदर, C- रायगड, D– मुरुड-जंजिरा

संबंधित बातम्या: जेव्हा KBCच्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सचिन खेडेकरांची भेट होते! ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर बिग बींची हजेरी!

संबंधित बातम्या: करोडपती होण्यासाठी सज्ज व्हा!, ‘कोण होणार करोडपती’ चं नवं पर्व 23 फेब्रुवारीपासून ‘सोनी मराठी’वर

संबंधित बातम्या: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सचिन खेडेकरांनी सांगितला आईनस्टाईनचा खास किस्सा, ऐका काय होती ‘ही’ गोष्ट…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.