अफेअरच्या आरोपावर अखेर चारू असोपाने सोडले माैन, म्हणाली फक्त एक Reel…
चारू हिच्या आरोपांवर उत्तर देताना राजीव यानेही तिच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर करण मेहरासोबत चारूचे अफेअर सुरू असल्याचे देखील राजीव याने म्हटले होते.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या भांडणामध्ये दररोज वेगवेगळे आरोप केले जात आहेत. सुरूवातीला चारू हिने मीडियासमोर येत राजीव याच्यावर गंभीर आरोप करत म्हटले होते की, मी गर्भवती असताना राजीव मला धोका देत होतो. त्याच्या बॅगमध्ये अशी एक गोष्ट मला सापडली की, ती पाहून मी हादरून गेले होते. इतकेच नाही तर घडलेला सर्व प्रकार मी कुटुंबीयांना सांगितला होता. त्यासोबत चारूने मारहाण आणि शिवीगाळचा आरोपही राजीव याच्यावर केला.
चारू हिच्या आरोपांवर उत्तर देताना राजीव यानेही तिच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर करण मेहरासोबत चारूचे अफेअर सुरू असल्याचे देखील राजीव याने म्हटले होते. करण आणि चारूचा एक व्हिडीओ इंस्टावर असल्याचे राजीव याने सांगितले. आता राजीव याच्या आरोपावर चारूने देखील उत्तर दिले आहे.
राजीव याने चारूवर आरोप करत म्हटले की, करण मेहरासोबत चारू हिचे अफेअर सुरू आहे आणि हे स्वत: मला चारूच्या आईनेच सांगितले होते. चारू हिने देखील यावर आता स्पष्टीकरण देत राजीव खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. करण मेहराच्या ज्या व्हिडीओबद्दल राजीव बोलत आहे, तो व्हिडीओ एका कार्यक्रमातील असल्याचे चारूने म्हटले आहे.
चारू म्हणाली की, राजीव याने माझे सर्व इंस्टाग्राम चेक केले. त्यामध्ये त्याला एक रील सापडले ज्यामध्ये मी आणि करण होतो. ते रील एका कार्यक्रमातील असून त्या कार्यक्रमात करण येणार हेही मला माहिती नव्हते. काहीतरी आरोप करायचे म्हणून राजीव असे खोटे आरोप माझ्यावर करत आहे. करण मेहराच नाही तर इतर कोणासोबतही माझे अफेअर नाहीये.