Charu Asopa | घटस्फोटाच्या चर्चांना थोडे दूर ठेवत ‘चारू असोपा’ने चाहत्यांची ही इच्छा अखेर केली पूर्ण
चारू आणि राजीव यांनी ऐकमेकांवर गंभीर आरोप देखील केले आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन हे त्यांच्या नात्यामुळे काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा असून चारू आणि राजीव यांनी ऐकमेकांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. राजीवचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप चारूने केला आहे. चारू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टीची अपडेट कायमच देते. चारूवर आरोप करत राजीव याने म्हटले होते की, करण मेहरासोबत चारूचे अफेअर सुरू आहे.
चारू आणि राजीव यांच्या आरोपांच्या सत्रामध्येच चारूने एक व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. चारूने चाहत्यांना तिचे नवे घर दाखवले आहे. जे चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे. आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीचे घर बघायला कोणत्या चाहत्यांना आवडत नाही. चारूने आपल्या नवीन घराचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करून त्यांना एकप्रकारे मोठे गिफ्ट दिले आहे.
काही दिवसांपूर्वी चारूने राजीवचे घर सोडले आहे आणि मुलगी जियानासोबत या नवीन घरात ती शिफ्ट झाली आहे. हे घर जरी छोटे असले तरीही आमच्यासाठी योग्य असल्याचे देखील व्हिडीओमध्ये चारू म्हणताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी याच घरातील एक डान्स व्हिडीओ चारूने सोशल मीडियावर शेअर केला होता. चारूचे आणि राजीवचे फॅन या दोघांना परत एकदासोबत पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अनेकांनी कमेंट करत चारूला सर्व काही विसरून नव्याने सुरूवात करण्याचा सल्ला देखील दिलाय.
राजीव सेन आणि चारू हे दोघे सोशल मीडियावर येत आरोप करत होते. मात्र, यावर राजीव सेनची बहीण अर्थात अभिनेत्री सुष्मिता सेन हिने काहीच भाष्य केले नाही. चारू आणि राजीव यांचा लवकरच घरस्फोट होणार असल्याची माहिती कळते आहे.