Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exclusive | ‘सेटवर अपशब्द वापरले, टोमणे मारले, मी मी माझं माझं!’ सहकलाकारांचे किरण मानेंवर गंभीर आरोप

Mulgi Jhali Ho Marathi Serial : त्यांना तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. चौथ्या वेळी त्यांना मालिकेतून नारळ देण्यात आला, असाही दावा करण्यात आला आहे. इतकंच काय तर मुलगी झाली हो मालिकेत या मुलीचे बाप म्हणून किरण माने भूमिका करत होते, तिनंही किरण मानेंवर गंभीर आरोप केलेत.

Exclusive | 'सेटवर अपशब्द वापरले, टोमणे मारले, मी मी माझं माझं!' सहकलाकारांचे किरण मानेंवर गंभीर आरोप
सहकलाकारांचे किरण मानेंवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 4:01 PM

सातारा : मुलगी झाली हो (Marathi Serial Mulgi Jhali Ho) ही स्टार प्रवाहवरील मराठी मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. किरण माने यांना या मालिकेतून काढल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकलं गेल्याचा आरोप आधी करण्यात येत होता. त्यानंतर काही व्यावसायिक कारणांमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला. अशातच आता मुलगी झाली हो या मालिकेचं शूटिंग ज्या साताऱ्यातील गावात सुरु आहे, तिथं टीव्ही 9 मराठीची टीम पोहोचली. या गावात सुरु असलेल्या शूटिंगही बंद पाडण्याबाबतचं एक पत्र व्हायरल झालं होतं. त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणी मुलगी झाली हो, मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी किरण माने (Actor Kiran Mane) यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता, असं त्यांच्या सहकलाकारांनी म्हटलंय. मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही कधीही काढून टाकेन, अशी भाषा त्यांनी वापरल्याचाही दावा किरण माने यांच्या सहकलाकारांनी केलाय.

किरण मानेंनी जे आरोप केले आहेत, त्यावर

राजकीय भूमिका घेतली, म्हणून त्यांना मालिकेतून काढलं गेलं, अशी खोटी बातमी किरण मानेंनी पसरवली, अशा गंभीर आरोप मालिकेतील कलाकारांनी केलाय. मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसनं त्यांना या मालिकेतून काढण्यात आलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याची त्यांना काहीही माहिती नव्हती, अशातलाही भाग नाही. त्यांना तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. चौथ्या वेळी त्यांना मालिकेतून नारळ देण्यात आला, असाही दावा करण्यात आला आहे. इतकंच काय तर मुलगी झाली हो मालिकेत या मुलीचे बाप म्हणून किरण माने भूमिका करत होते, तिनंही किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहे. किरण मानेंनी सेटवर अपशब्द वापरले. मला सारखे टोमणे मारले, असंही मुलगी झाली हो मालिकेतील किरण मानेंच्या सहकलाकारांनी म्हटलंय.

पाहा – किरण माने यांच्या सहकलाकारांसोबत केलेली Exclusive बातचीत

मुलगी झाली हो मालिकेत काम करणाऱ्या किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईला राजकीय रंगही देण्यात येतो आहे. दरम्यान, किरण माने यांनी नुकतीच शरद पवार यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनीही किरण माने यांच्यावर करण्यात आलेल्या हकालपट्टीवरुन प्रतिक्रिया दिल्यानं, या प्रकरणाला एक वेगळंच वळणही लागलंय.

संबंधित बातम्या :

मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर काहीच नाही!

किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात, ‘इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ!’

चार एक संघविचारी माझ्या विरोधात आहेत, मी बी कंबर कसलेली हाय, Kiran Mane यांची Facebook पोस्ट

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.