Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार, वाचा कधी, कुठे आणि केव्हा..
राजू श्रीवास्तव यांच्यावर आज म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वत्रच शोककळा पसरली आहे.

मुंबई : कॉमेडीचा बादशाह अर्थात राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे जरी आज आपल्यासोबत नसले तरीही त्यांनी असंख्य आठवणी मागे सोडल्या आहेत. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना लगेचच दिल्लीतील (Delhi) एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 42 दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. काल म्हणजेच 21 सप्टेंबर 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मावळली. रूग्णालयात दाखल केल्यापासूनच राजू हे व्हेंटिलेटरवर (Ventilator) होते. यादरम्यान त्यांना एकदाही शुद्ध आली नव्हती.
राजू श्रीवास्तव यांच्यावर आज होणारअंत्यसंस्कार
राजू श्रीवास्तव यांच्यावर आज म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वत्रच शोककळा पसरली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत राजू यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. सर्वांना आयुष्यभर हसवणारा कलाकार शेवटी रडवून गेलांय.
राजू यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
आज 22 सप्टेंबर 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे 9:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव द्वारकेतून घाटावर आणण्यात येणार आहे. राजू यांची पत्नी शिखा श्रीवास्तव आणि मुलगी अंतरा या सारख्या रडत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या शरीराच्या बाहेरील भागावर जखमेच्या कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.