Dance Deewane 3च्या मंचावर शगुफ्ता अलीने सांगितली ‘दर्दभरी दास्ताँ’, माधुरी दीक्षितने सरसावला मदतीचा हात!

या शोमध्ये अनिल कपूर, फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि रोहित शेट्टी दिसणार आहेत. या दरम्यान तेथे खूप मजा येईल, जी प्रेक्षकांना शोच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय. तथापि, यावेळी सेटवर भावनिक वातावरण प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Dance Deewane 3च्या मंचावर शगुफ्ता अलीने सांगितली ‘दर्दभरी दास्ताँ’, माधुरी दीक्षितने सरसावला मदतीचा हात!
शगुफ्ता-माधुरी
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 11:18 AM

मुंबई : ‘डान्स दिवाने 3’च्या (Dance Deewane 3) आगामी एपिसोडमध्ये बरीच खळबळ उडणार आहे. या शोमध्ये अनिल कपूर, फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि रोहित शेट्टी दिसणार आहेत. या दरम्यान तेथे खूप मजा येईल, जी प्रेक्षकांना शोच्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय. तथापि, यावेळी सेटवर भावनिक वातावरण प्रेक्षकांना पाहायला मिळेल (Dance Deewane 3 Madhuri Dixit gives 5 lakh rupees to Shagufta Ali for her further treatment).

यावेळी टीव्ही अभिनेत्री शगुफ्ता अली (Shagufta Ali) या शोमध्ये येऊन आपली वेदनादायक कहाणी सांगतील. होस्ट हर्ष लिंबाचिया शगुफ्ताला विचारतो की, आम्ही काही दिवसांपूर्वी आपल्याबद्दल एक लेख वाचला आहे की, आपल्याला काही आर्थिक अडचणी येत आहेत. त्याबद्दल सांगा.’

माधुरीकडून मदतीचा हात

शगुफ्ता म्हणाली, ‘गेल्या 4 वर्षांपासून माझ्याकडे कोणतेही काम नाही. पुन्हा मला मधुमेहही झाला, ज्यामुळे पायात आणि नंतर डोळ्यांमध्येही समस्या उद्भवली. मी बऱ्याच ऑडिशन दिल्या, पण मला काम मिळाले नाही.’ शगुफ्ताचे बोलणे ऐकल्यानंतर माधुरी दीक्षित त्यांच्याजवळ जाते आणि सांगते की शोच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी तुम्हाला पाच लाख रुपये देत आहे. माधुरीने चेक दिल्यानंतर शगुफ्ता यांना रडू कोसळले. त्याच वेळी भारती देखील भावूक झाली होती, परंतु नंतर ती सेटवरच सगळे वातावरण नीट हाताळते.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

रोहित शेट्टीने केली मदत

माधुरीपूर्वी रोहित शेट्टीनेही शगुफ्ताला मदत केली आहे. त्याने अभिनेत्रीला पैसे देऊ केले आहेत. रोहितकडून मदत मिळाल्यावर शगुफ्ता म्हणाल्या की, त्या रोहितला कधीच भेटल्या नाहीत किंवा बोलल्या नाहीत, परंतु तरीही त्याने मदत केली, ज्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. त्या म्हणाला की, रोहित दयाळू मनाचा माणूस आहे आणि देव आपला आशीर्वाद नेहमी त्याच्यावर ठेवेल.

माझ्यासाठी 2018पासून लॉकडाऊन!

आपल्या सद्य परिस्थितीचे वर्णन करताना शगुफ्ता यांनी ई-टाइम्सला सांगितले होते की, त्यांच्याकडे 2018पासून काहीच काम नाही. अभिनेत्री म्हणाली होती की, ‘मी बराच काळ उपचार घेत आहे आणि त्याचा खर्च देखील खूप जास्त आहे. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. मी स्वत: एकटीच हा खर्च पेलू शकत नव्हते, म्हणून इंडस्ट्रीतील मित्र परिवाराची मदत घेतली. माझ्यासाठी 2018पासूनच लॉकडाऊन सुरु आहे. कामाअभावी माझा ताणतणाव वाढत गेला आणि यामुळे मधुमेहाची समस्याही वाढली. मी आधी माझी कार आणि दागिने विकले. सुरुवातीला कोणाच्याही मदतीशिवाय हे सर्व हाताळले. माझ्याकडे कोणतीही स्थिर ठेव नाही, म्हणून हे सर्व विकल्यानंतर मला काही पैसे मिळाले.’ आपल्याला सुमित राघवन, सुशांत सिंह आणि नीना गुप्ता यांच्याकडूनही मदत मिळाल्याचे शगुफ्ताने सांगितले होते.

(Dance Deewane 3 Madhuri Dixit gives 5 lakh rupees to Shagufta Ali for her further treatment)

हेही वाचा :

‘साधी ओळखही नाही तरी माझ्यासाठी खूप केलं’, आर्थिक अडचणीत असलेल्या शगुफ्ताने मानले रोहित शेट्टीचे आभार!

Breakup Story | एकमेकांवर जीवापाड प्रेम, तरीही लग्नाच्या 2 वर्षांतच तुटलं करण-जेनिफर विंगेटचं नातं!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.