Death Anniversary | जसपाल भट्टींच्या ‘फ्लॉप शो’ने राजकारणी हादरले, अवघ्या 10 भागांनंतर गुंडाळली मालिका!

जसपाल भट्टी (Jaspal Bhatti) हे एक असे नाव आहे, ज्यांनी टीव्हीला जगाला नवी ओळख दिली. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता, त्या काळात त्यांनी लोकांना हसवण्याचे काम हाती घेतले होते. ते 90चे दशक होते, त्यावेळी ना केबल टीव्ही होते ना डिश टीव्ही...

Death Anniversary | जसपाल भट्टींच्या ‘फ्लॉप शो’ने राजकारणी हादरले, अवघ्या 10 भागांनंतर गुंडाळली मालिका!
Jaspal Bhatti
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 10:35 AM

मुंबई : जसपाल भट्टी (Jaspal Bhatti) हे एक असे नाव आहे, ज्यांनी टीव्हीला जगाला नवी ओळख दिली. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता, त्या काळात त्यांनी लोकांना हसवण्याचे काम हाती घेतले होते. ते 90चे दशक होते, त्यावेळी ना केबल टीव्ही होते ना डिश टीव्ही, तेव्हा दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच सरकारी वाहिन्या सुरु होत्या. टीव्हीचे सारे जग या दोन वाहिन्यांमध्ये बंदिस्त झाले होते. त्याचवेळी जसपाल भट्टी यांनी दूरदर्शनवर ‘फ्लॉप शो’ नावाचा शो सुरू केला. नाव जरी ‘फ्लॉप शो’ असले, तरी हा शो येताच प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला.

10 भागांनंतर शो बंद करावा लागला!

जसपाल भाटी हे स्वतः दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘फ्लॉप शो’चे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. या शोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक एपिसोडची कथा वेगळी होती. या शोमध्ये राजकारण, समाज आणि व्यवस्थेतील दोषांवर टोमणे मारण्यात आले होते. हा शो येताच खूप लोकप्रिय झाला पण या शोबद्दल दूरदर्शन आणि जसपाल भट्टी यांच्यात काही मतभेद झाल्यानंतर तो फक्त 10 भागांनंतर बंद झाला.

जसपाल भट्टी यांचे 25 ऑक्टोबर 2012 रोजी रस्ते अपघातात निधन झाले. जसपाल त्यांच्या बेधडक शैलीसाठी ओळखले जायचे. त्यावेळी ते दूरदर्शनवर सरकारी व्यवस्थेला टोमणे मारत शो बनवत असत, ही त्याकाळात सोपी गोष्ट नव्हती. त्यांची ही शैली आयुष्यभर कायम राहिली. त्यांनी आपल्या कामाने आणि वागण्याने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. जसपाल भट्टी यांचा जन्म 3 मार्च 1955 रोजी अमृतसर येथे झाला होता.

चंदीगड वाहतूक पोलिसांनी ब्रँड अॅम्बेसेडर बनवले!

जसपाल भाटी यांच्याशी संबंधित एक मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या दुर्दैवी रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर, 2013 मध्ये चंदीगड वाहतूक पोलिसांनी त्यांना 1 वर्षासाठी त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर घोषित केले होते. सीट बेल्ट बांधण्याचा नियम त्यांनी पाळला असता, तर जसपाल यांचा मृत्यू झाला नसता, असा पोलिसांचा विश्वास होता. म्हणूनच ते भट्टी यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवून लोकांना सीट बेल्ट घालण्यास प्रवृत्त करत होते.

दिग्गज कॉमेडियनने अमृतसर इंजिनीअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेतले होते, पण रंगभूमीवरील प्रेमाने त्यांना मनोरंजन विश्वात आणले. सुरुवातीला त्यांनी ‘द ट्रिब्यून’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकलेतून पदार्पण केले. त्यानंतर दूरदर्शनवरील शो ‘उल्टा पुल्टा’ करून ते प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्त्व बनले. यानंतर त्यांनी ‘फ्लॉप शो’ सुरू केला, जो त्याची पत्नी सविता भट्टी यांनी तयार केला होता.

जसपाल भट्टी यांनी मनोरंजन विश्वातील बदलांशी स्वतःला जुळवून घेतले आणि सिनेमातही खूप काम केले. ‘काडतूस’, ‘आ अब लौट चलें’, ‘जानम समझा करो’, ‘जानी दुश्मन’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘शक्ती’, ‘ये है जलवा’, ‘फना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

हेही वाचा :

Apurva Nemalekar : नाकात नथ आणि मराठमोळा अंदाज, पाहा अपूर्वा नेमळेकरचे क्लासी फोटो

Aryan Khan Drug Case : शाहरुखने 25 कोटी दिले असते तर आर्यन वाचला असता? समीर वानखेडेलाही मिळणार होते 8 कोटी? मुंबई क्रूझवर छाप्याचा कट?

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.