देवमाणसाचा अंत नाहीच? अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेलेला ‘देवमाणूस’ पुन्हा परतणार?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग काल (15 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. मात्र, यात असे काहीही दाखवले गेले नाही.
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग काल (15 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. मात्र, यात असे काहीही दाखवले गेले नाही.
काल प्रदर्शित झालेल्या शेवटच्या भागात डिम्पलच्या घरात सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. या पूजेला बसण्यासाठी मंगल आणि बाबूने देवीसिंग उर्फ डॉक्टरला या पूजेला बसण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन देवीसिंग पूजेला बसतो. मात्र इतक्यात चंदा पोलीस स्टेशन गाठते. इथे चंदा दिसत नसल्याने देवीसिंगची बोबडी वळते. तो तिला शोधायला बाहेर पडतो.
जाता जाता तावडीत सापडलं आणखी एक सावज
देवीसिंग चंदाला शोधायला बाहेर पडतो, इतक्यात डिम्पल त्याला भेटते आणि पळून जाण्याविषयीची नवीन योजना सांगते. यावर देवीसिंग तिला रात्री आठ वाजता भेट आपण पळून जाऊ असं सांगतो. ठरल्याप्रमाणे डिम्पल जाते. मात्र, इथे देवीसिंग जाता जाता नवीन सावज सापडत. जाता जाता देखील देवीसिंग लग्नाचे वचन दिऊन लुबाडण्याचा प्लॅन केलेल्या रिंकी भाभीचा जीव घेतो. तिच्या जवळील सगळा पैसा आणि दागिना घेऊन पाळण्याच्या तयारीत असतो.
संतापलेल्या डिम्पलने धरला चंदाचा हात..
इकडे देवीसिंगची वाट बघून थकलेल्या डिम्पलने चंदाकडे जाऊन देवीसिंगचा पूर्ण प्लॅन सांगितला. देवीसिंग पळण्याची तयारी करत असतानाच तिथे चंदा आणि डिम्पल पोहोचतात. यावेळी चंदा देवीसिंगकडून पैसा हिसकावून त्याच्या डोक्यात दगड घालते. देवीसिंग मेला असं समजून चंदा डिम्पलला निघून जायला सांगते. मात्र, डिम्पल चंदावर वार करून तिचा जीव घेते आणि पैशांची बॅग घेऊन तिथून पळ काढते.
देवीसिंग आणि चंदाचा अंत?
गावकरी डॉक्टरला शोधायला बाहेर पडतात तेव्हा त्यांना गावाबाहेर आग लागलेली दिसते. या आगीत त्यांना चंदाचा मृतदेह दिसतो, तर जवळच डॉक्टरचा चष्मा, घड्याळ आणि पेन दिसते. यावरून ते अंदाज लावतात की डॉक्टर देखील या आगीत मेला आहे. दुसरीकडे वाड्यात देखील पूर्वीप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरु होता. वाड्याच्या दारावरून डॉक्टरचा बोर्ड काढलेला आहे. एका रात्री सगळे झोपतात तेव्हा डिम्पल हळूच आपली बॅग उचलून बाहेर पडते. तर दुसरीकडे एक माणूस हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजताना दाखवलं आहे. तो माणूस मारतो आणि डॉक्टर त्याला मृत घोषित करून निघून जातात. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून, देवीसिंग असतो. डॉक्टर बाहेर जाताच तो पुन्हा जिवंत होतो आणि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते.
दुसरा सीझन येणार?
मालिकेच्या शेवटला, चंदासोबत आगीत दुसरा मृतदेह कोणाचा होता? ही आग नेमकी कोणी लावली? डिम्पलने पैशांची बॅग कुठे ठेवली? डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं? डिम्पल रात्री कुठे पळून जाते? तिला देवीसिंगबद्दल माहित आहे का? देवीसिंग पुन्हा जिवंत कसा होतो? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे या मालिकेचा दुसरा सीझन येणार, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत.
हेही वाचा :
नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला