Devmanus | देवीसिंग चंदाचाही खून करणार?, शेवटच्या टप्प्यावर आलेल्या मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे.

Devmanus | देवीसिंग चंदाचाही खून करणार?, शेवटच्या टप्प्यावर आलेल्या मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट!
प्रेक्षकांची आवडती देवमाणूस ही मालिका पुढच्या आठवड्यात निरोप घेणार आहे. रविवार 15 ऑगस्ट रोजी दोन तासांचा विशेष एपिसोड हा मालिकेचा शेवटचा भाग असेल. त्यामुळे डॉ. अजितकुमार देवचं काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 1:31 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे. मात्र, या आधी मालिकेत एक मोठा ट्वीस्ट येणार आहे.

मालिकेत देवीसिंगला आपल्या तालावर नाचवणाऱ्या चंदाचा आता खून होणार आहे. चंदाने वाड्यात आल्यापासून देवीसिंग उर्फ डॉ. अजित कुमार देव याला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे डॉक्टरसोबतच डिंपल देखील वैतागली आहे. अशातच आता डिंपल आणि डॉक्टरच्या हातून चंदाचा खून झाल्याचे दाखवण्यात येणार असल्याचे कळते आहे. मात्र, आता मालिकेत पुढे नेमके काय घडते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

नवा प्रोमो चर्चेत!

मालिकेचा नवा प्रोमो आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, तो खूप चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.

पाहा प्रोमो

‘देवमाणूस’ मालिकेत काय चाललंय ?

सध्या मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंह याची अकरा खुनांच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचं दाखवलं आहे. अजितकुमार घरी परतल्यावर डिम्पीसोबत त्याचं लग्न उरकण्याची घाई घरची मंडळी करत आहेत. मात्र मालिका निरोप घेत असल्याने आता कथेने वेग धरला आहे. देवीसिंह या हत्या प्रकरणांमध्ये पुन्हा कसा अडकणार, याचं कथानक आता दाखवलं जाणार आहे. सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटमध्ये टीआरपीत अव्वल ठरत आहे.

‘ती परत आलीये’ घेणार ‘देवमाणूस’ची जागा!

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव असणार आहे.

हेही वाचा :

‘तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार की कायम बंदच होणार?’, ‘रात्रीस खेळ चाले 3’ नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला!

‘आम्ही सगळे आता डोंबिवलीचा पासचं काढणार आहोत’, अरुंधतीची मुलं पोहोचली तिच्या भेटीला…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.