Devmanus | अखेर खेळ संपणार, ‘देवमाणसा’चा मुखवटा कायमचा उतरणार! पाहा ‘देवमाणूस’मध्ये पुढे काय घडणार…

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे.

Devmanus | अखेर खेळ संपणार, ‘देवमाणसा’चा मुखवटा कायमचा उतरणार! पाहा ‘देवमाणूस’मध्ये पुढे काय घडणार...
देवमाणूस
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 2:30 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता शेवटच्या प्रवासाकडे सुरु झाली आहे. मालिकेत आता आणखी काही नवे खुलासे होणार आहेत. या सगळ्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. मालिकेत मोठ्या ट्वीस्टसह डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग आता पोलिसांच्या तावडीत सापडणार असून, त्याला कडक शिक्षा देखील होणार आहे.

मालिकेचा नवा प्रोमो आता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, तो खूप चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये देवीसिंग आपले सगळे गुन्हे कबुल करताना दिसला आहे. त्यामुळे आता त्याने स्वतःहून गुन्हे मान्य केल्याने त्याला फाशीच्या सुळाकडे नेले जात आहे. अर्थात या बोगस डॉक्टरला आता फासावर चढवले जाणार आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो

‘देवमाणूस’ मालिकेत काय चाललंय ?

सध्या मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंह याची अकरा खुनांच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचं दाखवलं आहे. अजितकुमार घरी परतल्यावर डिम्पीसोबत त्याचं लग्न उरकण्याची घाई घरची मंडळी करत आहेत. मात्र मालिका निरोप घेत असल्याने आता कथेने वेग धरला आहे. देवीसिंह या हत्या प्रकरणांमध्ये पुन्हा कसा अडकणार, याचं कथानक आता दाखवलं जाणार आहे. सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटमध्ये टीआरपीत अव्वल ठरत आहे.

चंदा देविसिंगला पुरता अडकवणार!

भल्याभल्यांना मृत्युच्या दारात ढकलणारा देवीसिंग ऊर्फ डॉ. अजित कुमार देव आता चांगलाच अडकणार आहे. चंदाला लग्नाचं आमिष दाखवून, तिच्याकडून पैसे घेऊन फरार झालेला देवीसिंग अखेर आता चंदाच्या हाती लागला आहे. देवीसिंगने फसवल्यामुळे नको असूनही दारूच्या धंद्यात फसलेली चंदा आता देवीसिंगचा बदला घेणार आहे. डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग असल्याचा पुरावा चंदाकडे असल्याने, एरव्ही इतरांवर हुकुम गाजवणारा देवीसिंग आता चक्क चंदाच्या तालावर नाचतो आहे.

‘ती परत आलीये’ घेणार ‘देवमाणूस’ची जागा!

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव असणार आहे.

जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेते विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि, विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना, ते दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे?  या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत?  ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

(Devmanus Zee Marathi Serial Update Devisingh will be severely punished)

हेही वाचा :

‘तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार की कायम बंदच होणार?’, ‘रात्रीस खेळ चाले 3’ नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला!

‘आम्ही सगळे आता डोंबिवलीचा पासचं काढणार आहोत’, अरुंधतीची मुलं पोहोचली तिच्या भेटीला…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.