Breakup Story | एकमेकांवर जीवापाड प्रेम, तरीही लग्नाच्या 2 वर्षांतच तुटलं करण-जेनिफर विंगेटचं नातं!

टीव्हीच्या जगात अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले होते. यापैकी एक जोडी जेनिफर विंगेट (Jennifer Winget) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांची आहे. करण आणि जेनिफरचे प्रेम सर्वांनाच ठाऊक होते.

Breakup Story | एकमेकांवर जीवापाड प्रेम, तरीही लग्नाच्या 2 वर्षांतच तुटलं करण-जेनिफर विंगेटचं नातं!
करण-जेनिफर
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 8:41 AM

Jennifer Winget and Karan Singh Grover breakup story : टीव्हीच्या जगात अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का देण्याचे काम केले होते. यापैकी एक जोडी जेनिफर विंगेट (Jennifer Winget) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांची आहे. करण आणि जेनिफरचे प्रेम सर्वांनाच ठाऊक होते. दोघेही नेहमीच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. पण तरीही दोघांनाही ‘घटस्फोटा’चा मार्ग स्वीकारावा लागला (Dil Mil Gaye Fame Jennifer Winget and Karan Singh Grover breakup story).

एक काळ असा होता की, करण आणि जेनिफर टीव्हीच्या जगातील सर्वोत्कृष्ट जोडी मानले जात होते. पण त्यांच्या आयुष्यात एक असे वादळ आले, ज्यामुळे त्यांचे जग उध्वस्त झाले. असे म्हणतात की जेनिफर आणि करणच्या विभक्त होण्यामागे अभिनेत्याची प्रतारणा कारणीभूत ठरली होता.

करणचे आधीही लग्न झाले होते!

करण आणि जेनिफरची पहिली भेट झाली, तेव्हा करणचे लग्न झाले होते. अभिनेत्री श्रद्धा निगम ही त्याची पत्नी होती. रिपोर्ट्सनुसार करणने ‘दिल मिल गये’ या शोच्या शूटिंग दरम्यान श्रद्धाला घटस्फोट दिला होता. त्याचवेळी श्रद्धा निगमपासून विभक्त झाल्यानंतर करण जेनिफरच्या अगदी जवळ आला होता.

सेटवरच झाली भेट

करण सिंह ग्रोव्हर आणि जेनिफरची भेट प्रथम ‘दिल मिल गये’च्या सेटवरच झाली. या शोमध्ये करण आणि जेनिफर मुख्य भूमिकेत होते. या शो दरम्यान या दोघांची जवळीक वाढू लागली. जेव्हा ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा त्यांनी ते कुणापासून लपवले नाही.

लगेच उरकले लग्न

करण आणि जेनिफरने त्यांच्या नात्याला अधिकृत नाव देण्यास अधिक वेळ लावला नाही. दोघांनी 2012 मध्ये कुटुंबाच्या संमतीने लग्न केले. लग्नानंतरही दोघांचे प्रेम चाहत्यांनी बऱ्याच वेळा पाहिले होते. पण, याच दरम्यान त्यांच्या प्रेमाला नजर लागली.

बिपाशा ठरली कारण?

असं म्हणतात की, लग्नाच्या काही काळानंतर, जेनिफर तिची मालिका ‘सरस्वतीचंद्र’मध्ये व्यस्त झाली आणि करणला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करण आणि बिपाशा एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. या दोघांच्या अफेअरची बातमी बर्‍याच माध्यमांत येऊ लागली. पण, करण जेनिफरचा हात मध्यावरच सोडेल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. 2014मध्ये त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, जेव्हा लग्नाच्या केवळ 2 वर्षानंतर अभिनेत्रीने हे स्पष्ट केले होते की, ती आणि करण आता एकत्र नाहीत.

करण सिंह ग्रोव्हरने जेनिफरपासून घटस्फोट घेतल्यानंतर थोड्याच काळात तिसर्‍यांदा बिपाशा बसूशी लग्न केले. तर, जेनिफर अजूनही तिचे आयुष्य एकटीच जगत आहे.

(Dil Mil Gaye Fame Jennifer Winget and Karan Singh Grover breakup story)

हेही वाचा :

क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिमि’चा लूक, चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता!

लहानपणापासूनच अभिनयाची आवड, नीतू सिंहचा अभिनय पाहून प्रभावित झाल्या होत्या वैजयंती माला!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.