दीपिका कक्कर हिचा गेल्याच वर्षी झाला होता गर्भपात, पती शोएब इब्राहिम याने अखेर सांगितले की…

शोएबने फोटो शेअर करत आम्ही पालक होणार असल्याची घोषणा केलीये. शोएबच्या या पोस्टनंतर चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देताना दिसत आहेत.

दीपिका कक्कर हिचा गेल्याच वर्षी झाला होता गर्भपात, पती शोएब इब्राहिम याने अखेर सांगितले की...
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 6:26 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, दीपिका कक्कर ही प्रेग्नेंट असून बाळाला लवकरच जन्म देणार आहे. परंतू यावर पती शोएब इब्राहिम किंवा दीपिका यांनी काहीच भाष्य केले नव्हते. आता शेवटी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शोएबने फोटो शेअर करत आम्ही पालक होणार असल्याची घोषणा केलीये. शोएबच्या या पोस्टनंतर चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देताना दिसत आहेत. यासोबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय आणि इतक्या दिवस प्रेग्नेंसीची गुड न्यूज शेअर न करण्याचे थेट कारणीही सांगून टाकले आहे. दीपिका कक्कर ही तीन महिन्यांची प्रेग्नेंट आहे.

व्हिडीओमध्ये शोएब इब्राहिम हा इतके दिवस प्रेग्नेंसी का सर्वांपासून लपून ठेवली, याचे कारणही सांगतोय. शोएब म्हणाला, डाॅक्टर आणि घरातील ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की, तीन महिन्यांपर्यंत प्रेग्नेंसीची बातमी सर्वांनाच सांगूनये, म्हणून आम्ही लपून ठेवले होते.

इतकेच नाहीतर व्हिडीओमध्ये शोएब सांगत आहे की, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दीपिकाचा गर्भपात झाला होता. त्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला होता. माझी आई तर चिंतेमध्ये होती.

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

दीपिका त्यावेळी खूप जास्त दु:खी देखील होती. यादरम्यान आरोग्यासोबतच तिला मानसिक धक्का देखील बसला होता. मात्र, असे म्हणतात ना…दु:खानंतर सुख कायम येते…

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. दीपिकाच्या लग्नानंतर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती.

शोएबच्या अगोदर दीपिकाचे लग्न रौनक सॅमसन याच्यासोबत झाले होते. मात्र, यांचा संसार फार काळ टिकू शकला नव्हता. लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांमध्ये यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दीपिका ही शोएबच्या प्रेमात पडली. दीपिका बिग बाॅसची विजेती देखील आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.