दिव्यांश (Divyansh) आणि मनुराज (Manuraj) या जोडीने सोनी टीव्हीवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंड- सिझन 9’चं (Indias Got Talent Season 9) विजेतेपद पटकावलं. बीटबॉक्सिंग आणि बासरीवादन करत या दोघांनी प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मनं जिंकली. दिव्यांश हा मूळचा जयपूरचा तर मनुराज हा भरतपूरचा आहे. या दोघांनी अंतिम स्पर्धेत इशिता विश्वकर्मा, ऋषभ चतुर्वेदी, बॉम्ब फायर क्रू, वॉरियर स्क्वॉड, डिमॉलिशन क्रू आणि बी. एस. रेड्डी यांना मात देत 20 लाख रुपये आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. इशिता ही दुसऱ्या क्रमांकावर तर बॉम्ब फायर क्रू हा तिसऱ्या क्रमांकावर होता. या दोघांना पाच लाख रुपये बक्षीस मिळालं. ‘इंडियाज गॉट टॅलेंड 9’चं सूत्रसंचालन अर्जुन बिजलानी करत होता. तर किरण खेर, शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशीर या शोचे परीक्षक होते.
विशेष म्हणजे दिव्यांश आणि मनुराज हे ऑडिशनसाठी दुसऱ्या पार्टनरसोबत आले होते. मात्र शोदरम्यान या दोघांची जोडी जमली. या दोघांनी आपल्या जुगलबंदीने संपूर्ण सिझनमध्ये परीक्षकांवर विशेष छाप सोडली. दिव्यांश आणि मनुराज यांच्या परफॉर्मन्सना परीक्षक आणि पाहुणे म्हणून आलेल्या सेलिब्रिटींकडून सर्वाधिक ‘गोल्डन बझर’ मिळाले.
“बीटबॉक्सर असो, सितारवादक असो किंवा कोणतेही वाद्यवादक असो.. मला खात्री आहे की तेसुद्धा त्यांच्या कौशल्याने प्रकाशझोतात येऊ शकतात आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं”, अशी प्रतिक्रिया दिव्यांशने विजयानंतर दिली. तर मनुराज विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाला, “दिव्यांशसोबत माझी जोडी जमू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे अचानक घडलं आणि हा सर्व नशिबाचा खेळ होता असं मी म्हणेन. आमचा विजय हा देशातील सर्व वादकांचा विजय आहे जे अजूनही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झटत आहेत. भारतीय संगीत उद्योग आता बदलासाठी तयार आहे.”
रविवारी पाड पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये ‘हिरोपंती 2’चे कलाकार टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी हजेरी लावली होती. हिमेश रेशमिया, आदित्य नारायण, पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश आणि सलमान अली यांनी या फिनालेमध्ये परफॉर्म केलं.
हेही वाचा:
Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..
सोनम कपूरच्या घरी नर्सने कशाप्रकारे केली अडीच कोटींची चोरी? पोलिसांनी सांगितली Modus Operandi