Sunil Grover Net Worth : कधीकाळी महिन्याकाठी मिळायचे केवळ 500 रुपये, आता कोटींच्या संपत्तीचा मालक बनलाय सुनील ग्रोव्हर!

एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे ही कला प्रत्येकालाच येईल असे नाही. सुनील ग्रोव्हर हा विनोदी कलाकार, गायक, अभिनेता आणि टीव्ही होस्ट देखील आहे.

Sunil Grover Net Worth : कधीकाळी महिन्याकाठी मिळायचे केवळ 500 रुपये, आता कोटींच्या संपत्तीचा मालक बनलाय सुनील ग्रोव्हर!
सुनील ग्रोव्हर
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 9:48 AM

मुंबई : असे म्हटले जाते की, हसणे ही एक थेरपी आहे जी आपल्याला सर्व दुःखांना विसरायला लावून आपले सर्व त्रास दूर करते. परंतु, लोकांना हसवणे हे एक काम देखील आहे ज्यामुळे अनेकांची कारकीर्द घडते आणि ते यशाच्या शिखरावर चढतात. यांपैकीच एक आहे अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover), जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणतो.

एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे ही कला प्रत्येकालाच येईल असे नाही. सुनील ग्रोव्हर हा विनोदी कलाकार, गायक, अभिनेता आणि टीव्ही होस्ट देखील आहे. सुनीलला सायलेंट कॉमेडी शो ‘गुटर गु’ मधून ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने आपल्या कॉमेडी टायमिंगने सर्वांची मने जिंकली.

सुनील ग्रोव्हरचे नेटवर्थ

Caknowledge.com च्या अहवालानुसार, सुनील ग्रोव्हर सुमारे 18 कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत. गेल्या 5 वर्षात त्यांची संपत्ती 220 टक्क्यांनी वाढली आहे. कधीकाळी या अभिनेत्याला महिन्याकाठी केवळ 500 रुपये इतके मानधन मिळायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सुनील ग्रोव्हर एका ब्रँडचे काम करण्यासाठी 50-60 लाख रुपये इतके मानधन आकारतो. कमाईच्या बाबतीत अग्रेसर असलेला अभिनेता सुनील ग्रोव्हर समाजकार्य करायला मागे हटत नाही.

सुनील ग्रोव्हरचे घर

सुनील ग्रोव्हरने 2013 मध्ये मुंबईच्या उपनगर भागात एक घर खरेदी केले. त्याने ते घर अडीच कोटींना विकत घेतले. एवढेच नव्हे, तर देशातील अनेक शहरांमध्ये सुनीलची मालमत्ता आहे.

लक्झरी कारची आवड

सुनील ग्रोव्हरकडे अनेक आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. ज्यात रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू आणि ऑडीचा समावेश आहे.

अभिनयाने जिंकले सर्वांचे मन

सुनील ग्रोव्हरने कॉमेडी शो करण्याबरोबरच अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्येही काम केले आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये साकारत असलेल्या अनेक पात्रांनी त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मग ते गुत्थीचे पात्र असो किंवा डॉक्टर मशूर गुलाटी. तो सर्वांना खूप आवडतो. सुनीलच्या वेगवेगळ्या पात्रांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सुनीलने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाऊल ठेवले आहे. त्याची वेब सीरीज ‘तांडव’ आणि ‘सनफ्लॉवर’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्यात त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सुनीलने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. नेहमी हसत राहणारा सुनील वेब सीरीजमध्ये मात्र अतिशय गंभीर व्यक्तिरेखेत दिसला होता.

हेही वाचा :

मनी हाईस्टमध्ये प्रोफेसरचं प्रेम ‘रकैल’, मात्र वास्तविक जीवनात घेतेय अविवाहित जीवनाचा आनंद

‘जोधा अकबर’ फेम अभिनेता मोठ्या आर्थिक अडचणीत, आजारपणामुळे कापावा लागला पाय

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.