Mi Honar Superstar : मनोरंजनाचा डबल डोस, ‘मी होणार सुपरस्टार’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवतील. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोख्या प्रकारात या मंचावर पाहायला मिळतील. (Double dose of entertainment, 'Mi Honar Superstar' to hit the screens soon)

Mi Honar Superstar : मनोरंजनाचा डबल डोस, ‘मी होणार सुपरस्टार’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:33 AM

मुंबई : स्टार प्रवाहवर (Star Pravah) येत्या 21 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ (Mi Honar Superstar) या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवतील. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोख्या प्रकारात या मंचावर पाहायला मिळतील. मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पडणार आहे अभिनेता अंकुश चौधरी. तर संस्कृती बालगुडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. हिंदी रिअ‍ॅलिटी शो गाजवणारे नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे आणि कृती महेश या शोचे कॅप्टन आहेत.

अंकुशनं व्यक्त केल्या भावना

या ग्रॅण्ड रिअ‍ॅलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.’

सुत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडणार अभिनेत्री संस्कृती बालगुडे, व्यक्त केल्या भावना

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना संस्कृती म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या मंचावर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेण्ट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून अवाक व्हायला होतं. नृत्य ही माझी आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच नृत्याने झाली. त्यामुळे हा मंच नवी ऊर्जा देतो. मी पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असणार आहे अशी भावना संस्कृतीने व्यक्त केली.’

संबंधित बातम्या

Ti Parat Alie : ‘ती परत आलीये’च्या माध्यमातून अभिनेत्री कुंजिका काळविंट प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची वाढली उत्सुकता

देवमाणसाचा अंत नाहीच? अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेलेला ‘देवमाणूस’ पुन्हा परतणार?

नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....