हिना खान हिच्यावर भडकले युजर्स, थेट म्हणाले, थोडी लाज बाळग, उमराह करण्यासाठी गेली आणि
हिना खान हिने टिव्ही मालिकांपासून आपल्या करिअरची सुरूवात केली. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही हिना खान हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त अशी आहे. अगदी कमी वेळामध्ये हिना खान हिने खास ओळख नक्कीच मिळवलीये. काही दिवसांपूर्वीच हिना खास हिची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही कायमच चर्चेत असते. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या माध्यमातून हिनाने खास ओळख मिळालीये. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेनंतर हिना खान ही बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात दिसली. विशेष म्हणजे हिना खान ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी हिना बोल्ड फोटो अनेकदा शेअर करताना दिसते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिना खान ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. नुकताच हिना खान हिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे नेटकरी तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच हिना खान ही रमजान सुरू होण्यापूर्वी मक्का येथे पोहोचली होती. हिना खान हिने तिच्या आयुष्यातील पहिला उमराह नुकताच केलाय. यावेळी तिने हाॅटेलमधील काही फोटो शेअर केले. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये हिना खान ही हिजाबमध्ये दिसत होती. हिना खान हिने यावेळी अनेक फोटोही शेअर केले.
आता नुकताच शेअर केलेल्या फोटोमुळे हिना खान ही परत एकदा ट्रोल होताना दिसत आहे. हिना खान हिने रॅंप वॉकमधील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळेच तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या फोटोमुळे अनेकांनी तिला थेट खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली असून लाज वाटू दे असेही म्हणताना युजर्स दिसत आहेत.
एका युजर्सने हिना खान हिच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, जरा लाज वाटू दे, आताच उमराह करून आलीये ना, सना खान हिच्याकडून काहीतरी शिक, दुसऱ्याने लिहिले की वाटीभर पाण्यात बुडून हिना खान मर, तिसऱ्याने लिहिले उमराह करण्यासाठी गेली होती की फक्त फोटोशूट करण्यासाठी गेली होतीस. अजून एकाने लिहिले की, आताच मक्कावरून आली ना? मग हा नेमका कोणता प्रकार आहे…तिथे फक्त फोटो काढण्यासाठी गेली होतीस का?
मक्का येथील फोटो शेअर केल्यानंतर हिला खान हिला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सततच्या ट्रोलिंगमुळे हिना खान हिने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, देव महान आहे हे सर्वांनाच माहित आहे. पवित्र हेतू आणि एक नम्र इच्छा देवाच्या घरामध्ये कधीही नाकारली जाऊ शकत नाही. मी एवढेच सांगू शकते की मी कोणी संत नाही, परंतु माझा हेतू, दयाळूपणा आणि चांगल्या कृतींवर विश्वास आहे. हिना खान हिची ही पोस्ट व्हायरल झाली होती.