Urfi Javed | कपड्यांवरून नाही तर चक्क ‘या’ गोष्टीमुळे उर्फी जावेद ट्रोल
उर्फीने चित्रा वाघ यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर थेट भगव्या रंगाची बिकिनी घातली. अनेकजण उर्फीच्या कपड्यांवरून तिला टार्गेट करतात.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद (Urfi Javed) ही प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद ही तिच्या हटके कपड्यांच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट पोलिस स्टेशन गाठत उर्फी जावेद हिच्या विरोधात तक्रार (Complaint) दिली. उर्फी जावेदच्या कपड्यांच्या स्टाईल विरोधात चित्रा वाघ मैदानामध्ये उतरल्या. उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले. उर्फीला भेटेल तिथे चोपून काढण्याची भाषा चित्रा वाघ यांनी केली होती. मात्र, चित्रा वाघ यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम उर्फी जावेद हिच्यावर झालेला दिसला नाही. उर्फीने चित्रा वाघ यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर थेट भगव्या रंगाची बिकिनी घातली.
फक्त चित्रा वाघ याच नाही तर अनेकजण उर्फीच्या कपड्यांवरून तिला टार्गेट करतात. मात्र, उर्फीला याचा काहीच फरक पडत नाही. उर्फी हटके कपडे घालतेच. विशेष म्हणजे उर्फीची स्टाईलही अनेकांना आवडते.
अनेकदा उर्फीला सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळे ट्रोल व्हावे लागते. मात्र, यावेळी तिला कपड्यांमुळे नाही तर चक्क तिने घातलेल्या मास्कमुळे ट्रोल व्हावे लागत आहे. उर्फीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये उर्फी जावेद हिने चक्क जाळीचे मास्क घातले आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, असे जाळीदार मास्क घालून फायदा काय आहे? असे मास्क घालणे म्हणजे फक्त दिखावाच आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर उर्फी ट्रोल होणे ही काय पहिली वेळ नसून यापूर्वीही अनेकदा उर्फी ट्रोल झालीये. बिह बाॅस ओटीटीमधून उर्फीला खरी ओळख मिळालीये. उर्फीने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम देखील केले आहे.
उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून काही वर्षांपूर्वी ती मुंबईमध्ये दाखल झालीये. सोशल मीडियावर उर्फीची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. उर्फीच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक केले जाते.
काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला थेट जीवे मारून बलात्कार करण्याची धमकी दिली होती. याची पोस्ट उर्फीने सोशल मीडियावर शेअर केली होती. यानंतर पोलिसांनी या ब्रोकरला बिहारमधून अटक केली.