शालिन भनोट याची अवस्था पाहून एक्स पत्नी चिंतेत, दु:ख व्यक्त करत मुलासोबतचा फोटो…
विशेष म्हणजे शालिन हा टीना आणि प्रियंका यांना बोलत नसताना देखील काहीही कारणे काढून या शालिन भनोट याला भांडताना दिसत आहेत.
मुंबई : बिग बाॅस १६ च्या फिनालेसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यापूर्वीच्या सीजनमध्ये फिनाले (Finale) जसा जवळ येतो. त्यावेळी घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगले राहण्याचा प्रयत्न करताना दिसले होते. मात्र, याला बिग बाॅसचे १६ वे सीजन अपवाद ठरल्याचे दिसत आहे. प्रियंका चाैधरी आणि टीना दत्ता या शालिन भनोट (Shalin Bhanot) याला टार्गेट करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर जाता येता शालिनला ताणे मारताना देखील या दिसत आहेत. यामुळे घरात जोरदार भांडणे शालिन, प्रियंका आणि टीनामध्ये झाली. विशेष म्हणजे शालिन हा टीना आणि प्रियंका यांना बोलत नसताना देखील काहीही कारणे काढून या शालिन भनोट याला भांडताना दिसत आहेत. शालिन भनोट हा अर्चना गाैतम हिला बोलत असताना टीना आणि प्रियंका भांडणास सुरूवात करतात.
गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये शालिन भनोट हा एकटा पडल्याचे दिसत आहे. इतकेच नाहीतर त्याला कोणीही बोलत नाहीये. निम्रतला बोलताना शालिन म्हणाला की, मला कोणीच बोलत नाहीये. मला आता घरात राहायचे नाहीये.
टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी कारण नसताना शालिन भनोट याला टार्गेट करत असल्याचे शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या लक्षात येताच ते शालिन याला म्हणतात की, तू आमच्यासोबत बस, जर कारण नसताना त्या तुला त्रास देत असतील तर आम्ही आहोत तुझ्यासोबत
शालिन भनोट याची अवस्था पाहून त्याचे चाहते देखील चिंतेमध्ये आहेत. प्रियंका चाैधरी आणि टीना दत्ता यांचे हे रूप पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. एखाद्या व्यक्तीला इतका त्रास कसा देऊ शकता हे अनेकजण सोशल मीडियावर विचारताना दिसत आहेत.
शालिन भनोट याची ही अवस्था पाहून त्याची एक्स पत्नी दलजीत कौर देखील दु:खी झाल्याचे दिसत आहे. कारण प्रियंका आणि टीना यांच्यामुळे शालिन भनोट हा ढसाढसा रडताना बिग बाॅसच्या घरात दिसला आहे.
दलजीत कौर हिने इंस्टा स्टोरीवर आपल्या मुलासोबत एक फोटो शेअर करत लिहिले की, बिग बॉस संपायला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. शालीन भनोट तुमच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करते… धीर धरा, शांत राहा, धैर्यवान व्हा…आता दलजीतची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.