Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divorce | 9 वर्ष संसार, 9 महिन्यांपूर्वीच काडीमोड! आमीर-संजीदाची कुणालाच कानोकान खबर कशी नाही?

2012 साली त्यांचं लग्न झालं होतं. मात्र 2020 पासून त्यांचा एकमेकांशी वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर ते दोघंही वेगळे राहू लागले. पण असं नेमकं त्यांच्यात काय झालं होतं?

Divorce | 9 वर्ष संसार, 9 महिन्यांपूर्वीच काडीमोड! आमीर-संजीदाची कुणालाच कानोकान खबर कशी नाही?
आमीर आणि संजीदा
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 3:44 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी असलेल्या एका सेलिब्रिटी दाम्पत्याचा (Celebrity Couple) घटस्फोट झाला आहे. त्यांचा घटस्फोट (Divorce) होऊन नऊ महिने झालेही आहेत. मात्र गेल्या नऊ महिन्यात या दोघांनी याची कानोकान कुणाला खबरही होऊ दिली आहे. सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यात काय चालतं, काय काय घडतं, त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे एका उघड्या पुस्तकाप्रमाणं होऊन गेलेलं असतं. कुणीही यावं आणि वाचून जावं, असं चित्र सर्वसाधारणपणे बघायाला मिळतं. पण आमीर अली आणि संजीदा शेख यांच्या घटस्फोटाबाबत फार उशिरानं सगळ्यांना कळलंय. संजीदा आणि आमीरच्या जवळच्या एका व्यक्तीनं याला दुजोरा दिला असल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्स दिली आहे.

हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना आमीर आणि संजीदाच्या जवळच्या एका व्यक्तीनं सूत्रांशी बोलताना ही माहिती दिली आहे. या दोघांनाही आपल्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा झालेली आवडत नसल्याचंही देखील म्हटलंय. त्यामुळेच ही बाब कुणालाच कळली नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून आमीर आणि संजीदा विभक्त होणार आहे, अशी कुजबूज सुरु होती. मात्र अधिकृतपणे याबाबत कुणालाच काही माहिती मिळू शकली नव्हती.

View this post on Instagram

A post shared by Aamir Ali (@aamirali)

दोन वर्षांची मुलगीही आहे

दरम्यान, अभिनय क्षेत्रात असलेल्या आमीर आणि संजीदा यांना एक दोन वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव आहे आर्या. सध्या आर्याचा ताबा तिच्या आईकडे असून ती आईसोबत राहत असल्याचंही हिंदुस्थान टाईम्सनं आपल्या वृत्तामध्ये म्हटलंय. दरम्यान, आमचा घटस्फोट झाला असल्याचं या दोघांनीही मान्य केल्याचं समोर आलंय.

View this post on Instagram

A post shared by Aamir Ali (@aamirali)

9 वर्षांचा संसार

आमीर आणि संजीदा दोघंही अभिनय क्षेत्रात काम करतात. 2012 साली त्यांचं लग्न झालं होतं. मात्र 2020 पासून त्यांचा एकमेकांशी वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर ते दोघंही वेगळे राहू लागले. संजीदा शेख ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं क्या होगा निम्मो का या सीरियलमधून आपल्या करियरला सुरुवात केली होती. इतकंच काय, तर नच बलियेच्या तिसऱ्या सीझनमध्ये या जोडीनं भागही घेतला होता आणि ही स्पर्धा जिंकली होती. तर दुसरीकडे आमीरने जाहिरातींमधून आपल्या करीयरला सुरुवात केली होती. तर काही चित्रपटांमध्ये त्यानं छोटे-मोठे रोल केले होते. कहानी घर घर की, या मालिकेतून आमीर घराघरांत पोहोचला होता.

इतर बातम्या –

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Salman Khan | आतापर्यंत रहस्यच होत्या सलमानच्या आयुष्यातील काही गोष्टी, एक्स-गर्लफ्रेंडने केले मोठे खुलासे..

Disha Patani | टायगर श्रॉफच्या शर्टलेस फोटोवर फिदा झाली दिशा पाटनी, कमेंट करत म्हणाली….

पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.