Uorfi Javed | नेटकऱ्यांनी उडवली उर्फी जावेद हिची खिल्ली, व्हिडीओ पाहून चाहते हैराण
टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतानाही उर्फी बऱ्याच वेळा दिसते. काहीजण उर्फी जावेद हिचे काैतुकही करताना दिसतात. नुकताच उर्फी जावेद हिचा अतरंगी स्टाईलमधील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद (Uorfi Javed) कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. अतरंगी कपडे घालून उर्फी ही कायमच स्पाॅट होते. उर्फी जावेद हिची नवीन स्टाईल पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी विचित्र मेकअप उर्फी जावेद हिने केला होता. यामुळे उर्फी जावेद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आली होती. मात्र, आपल्या कपड्यांना कोण काय बोलते याचा काहीच फरक उर्फी जावेद हिच्यावर पडत नाही. टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देतानाही उर्फी बऱ्याच वेळा दिसते. काहीजण उर्फी जावेद हिचे काैतुकही करताना दिसतात. नुकताच उर्फी जावेद हिचा अतरंगी स्टाईलमधील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही काळ्या रंगाच्या मोनोकिनी टॉपमध्ये दिसत आहे. यासोबत उर्फीने पन्नीचा लॉन्ग स्कर्ट घातला आहे. उर्फीचा हा आउटफिट हटके दिसतोय. यासोबत तिने कानामध्ये मोठे झुमके घातले असून पांढऱ्या रंगाची हील्स घातली आहे. आता याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फी जावेद हिच्या या हटके लूकवर प्रत्येकाचे लक्ष जाताना दिसतंय. कारण यावेळी तिने अतरंगी असे काहीतरी केलंय. मात्र, सोशल मीडियावरील युजर्सला उर्फी जावेद हिची ही स्टाईल अजिबात आवडल्याचे दिसत नाहीये. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. उर्फीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातंय.
एका युजर्सने लिहिले की, आता फक्त हेच बघायचे बाकी होते. दुसऱ्याने लिहिले की, आता काही शिल्लक राहिले आहे का मॅडम? तिसऱ्याने लिहिले, हिला फक्त ट्रोल होऊन फेमस व्हायचे आहे. असून एकाने लिहिले की, हिला कशाचाच फरक पडत नाही. दुसरीकडे काही लोकांना उर्फी जावेद हिचा हा लूक आवडला आहे. उर्फी जावेद हिने टाॅप न घालता आणि हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेऊनही काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शूट केला होता.
काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे एका ब्रोकरणे बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला बिहारमधून अटक केली. या व्यक्तीने उर्फी जावेद हिला मेसेज केले होते, ज्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.